शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी टाळण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील रस्ते केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

हॉटेल, खानावळ, पशुखाद्य, शेती उपयोगी साहित्य, कृषी केंद्र, किराणा व्यावसायिकांना केवळ घरपोच सेवा देण्यासाठीच दिलेल्या कालावधीत आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडता येणार आहे, पण दुकाने उघडल्यावर नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता असल्याने वर्धा नगरपालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बाजारपेठेतील प्रमुख रस्ते बाबू बांधून सील केले आहेत. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेतील नागरिकांची संभाव्य गर्दी टाळता आली.

ठळक मुद्देशिथिलतेच्या पहिल्या दिवशी पेट्रोलपंप अन् बँकांत उसळली गर्दी : सूचनांचे पालन करून घेण्यासाठी पथक होते सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दहा दिवसांच्या कठोर लॉकडाऊननंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागात थोडी शिथिलता मिळाली, पण याच शिथिलतेच्या पहिल्या दिवशी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होऊ नये, म्हणून बाजारपेठेतील रस्ते सील करण्यात आले आहेत, तर मंगळवारी पेट्रोलपंप आणि बँकांमध्ये नागरिकांची गर्दी बघावयास मिळाली.जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या आदेशानुसार,  केवळ वैद्यकीय कारणासाठीच नागरिकांना १ जूनपर्यंत घराबाहेर पडता येणार आहे, तर हॉटेल, खानावळ, पशुखाद्य, शेती उपयोगी साहित्य, कृषी केंद्र, किराणा व्यावसायिकांना केवळ घरपोच सेवा देण्यासाठीच दिलेल्या कालावधीत आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडता येणार आहे, पण दुकाने उघडल्यावर नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता असल्याने वर्धा नगरपालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बाजारपेठेतील प्रमुख रस्ते बाबू बांधून सील केले आहेत. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेतील नागरिकांची संभाव्य गर्दी टाळता आली. असे असले, तरी शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ होती.

रस्त्यावर होती वर्दळकठोर निर्बंधांमुळे तब्बल दहा दिवस निर्मनुष्य राहिलेल्या रस्त्यांवर मंगळवारी नागरिकांची वर्दळ बघावयास मिळाली. कुणी वैद्यकीय कारणासाठी तर कुणी अत्यावश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते, तसेच काही विनाकारण घराबाहेर पडल्याने चित्र बघावयास मिळाले.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला बगलविविध कामांसाठी मंगळवारी नागरिकांची बँकांसमोर गर्दी केली होती. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन झाले, तर बहुतांश ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमाला बगलच मिळाली.

बाजारपेठेत जाऊन भाजीपाला खरेदी भोवलीमंगळवारी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर शेतकऱ्यांचा भाजीपाला ठोक व्यापाऱ्यांसह किरकोळ भाजीविक्रेत्यांनी खरेदी केला, पण या ठिकाणी काही नागरिकही थेट भाजीपाला खरेदी करीत असल्याचे पुढे आल्यावर, काविड नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी भाजीपाल्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार