शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कारला गावात येणारा रस्ता केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

लॉकडाऊन असल्याने नागरिक घरीच स्तब्ध झाले आहे. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे गावठी दारूचा महापूर यामुळे कारला गावातील नागरिक दहशतीच्या सावटाखाली होते. कारला गावातील सावजीनगर परिसरात गावठी दारूविक्री राजरोसपणे सुरू होती. याबाबत अनेकदा पोलिसांना माहिती दिली. पण, पोलिसांकडून कुठलीही कारवाई दारूविक्रेत्यांवर करण्यात आली नाही.

ठळक मुद्देमहिलांनी उचलले पाऊल : हिवरा (तांडा) घटनेचे शहरातही उमटले पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या कारला गावातील सावजी नगर परिसरात गावठी दारूची सर्रास विक्री होत होती. हिवरा (तांडा) येथे दारूविक्रेत्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. याचे पडसाद कारला गावात उमटले असून महिलांनी कारला गावात येणारा मुख्य रस्ता बंद केला.लॉकडाऊन असल्याने नागरिक घरीच स्तब्ध झाले आहे. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे गावठी दारूचा महापूर यामुळे कारला गावातील नागरिक दहशतीच्या सावटाखाली होते. कारला गावातील सावजीनगर परिसरात गावठी दारूविक्री राजरोसपणे सुरू होती. याबाबत अनेकदा पोलिसांना माहिती दिली. पण, पोलिसांकडून कुठलीही कारवाई दारूविक्रेत्यांवर करण्यात आली नाही.नुकताच हिवरा (तांडा) येथे एका मृत महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. इतकेच नव्हेतर ती महिला गावठी दारूविक्री करणारी असल्याचे समजताच गावातील नागरिकांची भंबेरीच उडाली. गावातही मोठ्याप्रमाणात गावठी दारुविक्री सुरू असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाच्या दहशतीचे सावट पसरले आहे. त्यामुळे कारला गावातील सावजीनगर परिसरातील महिलांनी दारूविक्रीवर आळा बसण्यासाठी गावातील मुख्य मार्गच बंद केला असून बाहेरून येणाऱ्यांना चांगलाच धडा शिकविल्या जात आहे.दोन दिवसांपूर्वी झाली होती हत्यादोन दिवसांपूर्वीच पैशाच्या वादातून दारूविक्रेता राहुल किसना मगर याची हत्या करण्यात आली होती. कारला येथे काही दारूविक्रेते राजरोसपणे दारूची विक्री करीत असून पोलिसांनी याकडे लक्ष देत दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहरात अफवांना फुटले पेवहिवरा (तांडा) येथील मृत महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने संपूर्ण प्रशासन खडाडून जागे झाले. याचे पडसाद शहरातही उमटले. दिवसभर शहरात वेगवेगळ्या अफवांना पेव फूटले होते. जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची महिती होताच शहरातील इंदिरानगर, गांधीनगर परिसरातील नागरिकांनी स्वत:हूनच फलक लावून रस्ते दोर बांधून रस्ते बंद केले. परंतु, शहरात या परिसरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसर बंद केल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. या अनुषंगाने का होईना शहरातील नागरिकांनी कोरोना आजाराचे गांभीर्य ओळखले असल्याचे एकंदरीत चित्र शहरात पहावयास मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या