शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकेत ग्रामस्थांची परवड

By admin | Updated: August 14, 2014 23:52 IST

येथील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या बँकेत आर्थिक व्यवहाराकरिता आलेल्या ग्राहकांना ताटकळत रहावे लागते.

साहूर : येथील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या बँकेत आर्थिक व्यवहाराकरिता आलेल्या ग्राहकांना ताटकळत रहावे लागते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत ग्राहकांची ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी होत आहे.साहूर येथे बँक आॅफ इंडिया तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा दोन शाखा कार्यरत होत्या. परंतु काही महिन्यांपूर्वी येथील शाखा बंद झाली आहे. यामुळे सर्व व्यवहार एकमेव शाखा असलेल्या बँक आॅफ इंडिया येथे वळते केले आहे. परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकांचे व्यवहार याच शाखेतून सुरू आहेत. यामुळे खातेदारांची संख्या कमालीची वाढली आहे. यातच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामाचा निपटारा लवकर होत नाही. परिसरातील सर्व कर्मचारी आणि बचत गटाचे व्यवहार याच बँकेतून होत आहे. परंतु या शाखेत तीनच कर्मचारी आहे. परिणामी ग्राहकांना सुरळीत सेवा मिळत नाही.येथील शाखेत रोख व्यवहाराचे एकच काऊंटर असल्याने पैशाचा व्यवहार करताना ग्राहकांना तब्बल तीन तास रांगेत उभे राहण्याची वेळ येते. याबाबत शाखा व्यवस्थापक मिथिलेश मालाकर यांच्याकडे ग्राहकांनी तक्रार दिली आहे. व्यवस्थापक आणि दोन कर्मचारी असे येथील शाखेच्या पदाचे स्वरुप आहे. यातही ब्रॉडबॅड सेवेत व्यत्यय येत असल्याने ही बाब ग्राहक सेवेत आडकाठी ठरते. इंटरनेटसेवा वारंवार खंडित होत असल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे ग्राहकांची परवड होत असल्याने बऱ्याचदा येथील कर्मचाऱ्यांना नाहक ग्राहकांच्या रोशाला बळी पडावे लागते. ग्राहकांना तासनतास ताटकळत राहावे लागत असून अडचणीच्यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सदर कामे करावी लागतात. येथील शाखेत रोख व्यवहाराचे एकच काऊंटर असल्याने ग्राहकांची कायम रांग लागलेली असते. येथे अतिरीक्त कर्मचारी नियुक्त करून येथे अतिरीक्त काऊंटर देण्याची मागणी केली जात आहे. साहुरवासीय आणि परिसरातील ग्रामस्थांना बँकेचे काम करण्याकरिता ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे काही खातेदार सकाळपासून कार्यालयासमोर रांगा लावतात. खातेदारासह कर्मचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. खातेदारांची संख्या वाढतच असल्याने कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येते. यामुळे सेवा देखील प्रभावित होते. येथील शाखेचा वाढता व्याप पाहता सदर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचारी संख्या वाढवित दोन कॅश काऊंटर सुरू करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)