‘त्या’ तिघांचा अहवाल ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:00 AM2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:25+5:30

कोरोना बाधित क्षेत्रातून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यात आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. त्यापैकी ५४ व्यक्तींची रविवारपर्यंत होम क्वारंटाईन मधून सुटका करण्यात आली होती. तर सोमवारी आणखी २० व्यक्तींना होम क्वारंटाईन मधून मुक्त करण्यात आले आहे.

The report of the 'three' is 'negative' | ‘त्या’ तिघांचा अहवाल ‘निगेटिव्ह’

‘त्या’ तिघांचा अहवाल ‘निगेटिव्ह’

Next
ठळक मुद्देसावधगिरी बाळगणे क्रमप्राप्त; पण बेफिकर दिसताहेय वर्धेकर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विविध कार्य युद्धपातळीवर केले जात आहेत. यापूर्वी चार व्यक्तींचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर रविवारी आणखी तीन संशयीतांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. सदर अहवालानुसार प्रकृती अस्थिर असलेले हे तिन्ही व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कोरोना बाधित क्षेत्रातून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यात आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. त्यापैकी ५४ व्यक्तींची रविवारपर्यंत होम क्वारंटाईन मधून सुटका करण्यात आली होती. तर सोमवारी आणखी २० व्यक्तींना होम क्वारंटाईन मधून मुक्त करण्यात आले आहे. तर उर्वरित ३५ व्यक्ती सध्या गृह निगराणी (होम क्वारंटाईन) मध्ये आहेत. त्यांच्यात कोरोनाची कुठली लक्षणे आढळतात काय यावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. सुरूवातीला चार व्यक्तींच्या घशातील द्रवासह रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले. तर रविवारी आणखी तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तेही निगेटिव्ह आले आहे. एकूणच वर्धा जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिवाय जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. परंतु, रविवारच्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी वर्धेकर बेफिकीर असल्यागत घराबाहेर निघाल्याचे दिसून आले.
कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक वर्धेकराचे सहकार्य सध्याच्या आपातकालीन स्थितीत कर्तव्य बजावणाºया अधिकाºयांना मिळाले नाही तर नागरिकांना घरात बसविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कठोर भुमिका घ्यावीच लागणार असल्याचे सांगण्यात आले.

रविवारी जनता कर्फ्यूला वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्पूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांची गर्दी न होऊ देणे तसेच एका नागरिकाचा दुसºया नागरिकासोबत संपर्क न येऊ देणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा कठोर पावले उचलण्यात येईल.
- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

रविवारी तीन व्यक्तींच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या व देण्यात येत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

Web Title: The report of the 'three' is 'negative'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.