शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Wardha; वर्धा जिल्ह्यात बाहेरून आलेल्या २ हजारांहून अधिक व्यक्तींची नोंदणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 07:00 IST

पुणे, मुंबई सोबतच इतर जिल्हे आणि राज्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या २ हजार ३२७ लोकांच्या गृह विलगिकरणाची प्रक्रिया प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपुण्यामुंबईहून १२०० नागरिकांचे आगमनगृह विलगीकरणाची प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आणि प्रत्येक गावातील, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांनी गावात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात आतापर्यंत इतर जिल्ह्यातून येणाऱ्या २३२७ लोकांची नोंदणी झाली आहे. यामध्ये, पुणे, मुंबई सोबतच इतर जिल्हे आणि राज्यातून आलेल्या व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. या २ हजार ३२७ लोकांच्या गृह विलगिकरणाची प्रक्रिया प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आहेत. राज्य शासनाने लॉक डाऊन, सार्वजनिक वाहतूक बंद केली, तेव्हा इतर जिल्ह्यात असलेल्या नागरिकांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कोरोनाबाधित शहरातून वर्धा जिल्ह्यात आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने अशा प्रदेशातून आलेल्या व्यक्तींना त्यांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन केले होते. तसेच गाव आणि शहरातील आशा, अंगणवाडी सेविका, यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणजे प्रशासनाकडे आतापर्यंत २ हजार ३२७ व्यक्तींची नोंदणी झाली आहे. यामध्ये वर्धा - ८१२, हिंगणघाट-१०१, आर्वी-१००, आष्टी -३२०, कारंजा-७१, समुद्रपूर-३२ देवळी-१८९, सेलू -७०२ नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये केवळ पुणे, मुंबईहून १२०० व्यक्ती आल्या आहेत.१४ दिवस गृह विलगिकरणआता आरोग्य विभाग प्रत्येकाला १४ दिवस गृह विलगिकरणात ठेवण्याची प्रक्रिया करीत आहे. प्रत्येकाच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. तसेच गृह विलगिकरणात घ्यावयाची काळजी इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.प्रत्येक व्यक्तीसाठी गावातील आशा, अंगणवाडी, ग्रामसेवक, आरोग्य सहाय्यक यांना गृह विलगिकरणात असलेली व्यक्ती सूचनांचे पालन करते की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिलेली आहे. यातील २2 व्यक्ती आयसोलेशन मध्ये आहेत. त्यांना किंचित ताप असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.जिल्ह्यात परदेशी प्रवास करून आलेल्या व्यक्तींची संख्या ११२ वरजिल्ह्यात कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींची संख्या आता ११२ झाली आहे. यापैकी ७६ व्यक्तींना गृह विलगिकरणातून बाहेर काढले आहे. तर आतापर्यंत ९ व्यक्तींच्या कोरोना विषाणूच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत. यामध्ये सेवाग्राम येथून - २, हिंगणघाट -२, सावंगी - १ आणि सामान्य रुग्णालय - ४ असे एकूण ९ व्यक्तीचे स्त्राव पाठविण्यात आले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत परदेशातून आलेल्या ३६ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस