वर्ध्यात उभारली ‘राजमाता जिजाऊ बुक बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:06+5:30

वाचन संस्कृती रुजविण्यासोबतच, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी याकरिता वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १ लाख रुपये किमतीची पुस्तके गोळा केली. जिल्ह्यात जेमतेम परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र, हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना महागडी पुस्तके खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे होतकरू असूनही कित्येक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना या परीक्षांपासून मुकावे लागते. ही सल मनात ठेवून वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने स्पर्धा परीक्षा व अभ्यासाची इतके पुस्तके संकलनाचा एकसूत्री कार्यक्रम राबविला.

Rajmata Jijau Book Bank established in Wardha | वर्ध्यात उभारली ‘राजमाता जिजाऊ बुक बँक’

वर्ध्यात उभारली ‘राजमाता जिजाऊ बुक बँक’

ठळक मुद्देवीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचा पुढाकार : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना होईल मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मराठा सेवा संघ प्रणीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने लाखाचा निधी उभा करीत राजमाता जिजाऊ ‘बुक बँक’ उभारली आहे. यामुळे अनेक गरजू प्रतिभावंत विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार आहे.
वाचन संस्कृती रुजविण्यासोबतच, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी याकरिता वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १ लाख रुपये किमतीची पुस्तके गोळा केली. जिल्ह्यात जेमतेम परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र, हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना महागडी पुस्तके खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे होतकरू असूनही कित्येक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना या परीक्षांपासून मुकावे लागते.
ही सल मनात ठेवून वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने स्पर्धा परीक्षा व अभ्यासाची इतके पुस्तके संकलनाचा एकसूत्री कार्यक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाला यश येत तब्बल १ लाख रुपयांची पुस्तके गोळा झाली. गोळा झालेल्या पुस्तकातूनच त्यांनी राजमाता जिजाऊ बुक बँक ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. २३ मार्चपासून ही बुक बँक खुली केली जाणार आहे. या कार्यात दुष्यंत ठाकरे, शंतनू भोयर, अजिंक्य मकेश्वर, धीरज चौहान, वैष्णवी डाफ, कृतिका भोयर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

भेटस्वरूपातील रक्कमही देणार
नीरज यांचा नुकताच विवाह झाला. यावेळी भेट स्वरूपात आलेली रक्कमही पुस्तकांच्या खरेदी करण्याकरिता उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. आपल्या एका छोट्याशा मदतीमुळे गरीब कुटुंबातील मुलेही उच्च शिक्षण घेऊन मोठमोठी पदे भूषवितील, असे नीरज बुटे म्हणाले.

Web Title: Rajmata Jijau Book Bank established in Wardha