शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणासाठी येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत बस कारंजा बसस्थानकावरून पूर उतरेपर्यंत न सोडण्यात आल्याने बसस्थानकावरच ताटकळत होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यासह बैलजोडी गेली वाहून : विद्यार्थ्यांचा रात्री ११ पर्यंत बसस्थानकावरच मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहा:कार उडाला. जनजीवन प्रभावित झाले. दानापूर येथील शेतकरी धाम नदीत वाहून गेला. गुणवंत घसाड (५०) असे शेतकºयाचे नाव आहे. वृत्त लिहितोवर मृतदेहाचा शोध लाग शकला नव्हता. तसेच ढगा येथील शेतकरी विजय चपंत कुरसंगे यांची बैलजोडी धाम नदीच्या महापुरात वाहून गेली. दोन्ही घटनेची तहसीलदार सचिन कुमावत यांनी नोंद घेतली असून रात्री १० वाजतापर्यंत घटनास्थळावर उपस्थित होते.मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणासाठी येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत बस कारंजा बसस्थानकावरून पूर उतरेपर्यंत न सोडण्यात आल्याने बसस्थानकावरच ताटकळत होते. याविषयी शिक्षकांना माहिती मिळताच इंदिरा कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा किनकर, मॉडेल हायस्कूलचे पर्यवेक्षक ढोले, कपारे, प्रदीप झुटी, कस्तुरबा विद्यालयाचे बाबाराव मानमोडे, ढबाले आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरी नेऊन त्यांची जेवणाची व्यवस्था केली. तहसीलदार कुमावत यांनीही रात्री १० वाजता बसस्थानक गाठून परिस्थितीची माहिती घेतली. पूर ओसरत नाही तोवर बस न सोडण्याबाबत वाहतूक नियंत्रकांना सूचना दिल्या.मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणीकारंजा तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरातील अनेक शेतींमध्ये अद्याप पाण्याचे डबके साचलेले असून पीकही पाण्याखाली आले आहे. शासकीय यंत्रणेने पिकांची पाहणी करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.विद्यार्थ्यांच्या जेवणाची केली व्यवस्थाकारंजा तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणाकरिता येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील शेकडोवर विद्यार्थी बसस्थानकावरच रात्री उशिरापर्यंत ताटकळत होते.या विद्यार्थ्यांची मुख्याध्यापिका, शिक्षकांनी जेवणाची व्यवस्था केली. तहसीलदारांनीही परिस्थिती जाणून घेतली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर