शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची संततधार

By admin | Updated: July 23, 2014 00:07 IST

पावसाने जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली असून, मागील दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.५९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.

वर्धा : पावसाने जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली असून, मागील दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.५९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. नदी व नाले ओसंडून वाहत असून, लालनाला सिंचन प्रकल्पामधून पाणी सोडण्यात आले आहे.दिवसभर सुरू असलेल्या पावसाने सांयकाळी चांगलाच जोर धरला. यामुळे लाल नाला धरणाचे पाचही दार उघडण्यात आल्याने मार्डा येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. शिवाय या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वाधिक २८.२० मि. मी. पाऊस समुद्रपूर तालुक्यात पडला असून, वर्धा येथे १६.३० मि. मी., हिंगणघाट १७.०० मि. मी., सेलू १२ मि. मी., देवळी १२.६० मि. मी., कारंजा १०.२० मि. मी., तर आर्वी व आष्टी तालुक्यात सरासरी ६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला असला तरी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या जलाशयाच्या पातळीतही वाढ होत असून, बोर प्रकल्पामध्ये ४२.५८ द.ल.घ. (३४.५६), धाम प्रकल्प १२.१२ द.ल.घ. (२०.३८ टक्के), पोथरा प्रकल्प ३३.६३ द.ल.घ. (९६.८४ टक्के), पंचधारा प्रकल्प १.६० द.ल.घ. (१८.२८ टक्के), डोंगरगाव प्रकल्प १.६६ द.ल.घ. (२४.२ टक्के), लालनाला प्रकल्प १६.२८ द.ल.घ. (५८.९७ टक्के), नांद प्रकल्प ३४.७२ द.ल.घ. (६५.३० टक्के), वर्धा प्रकल्प ६.६४ द.ल.घ. (४४.५९ टक्के), उर्ध्ववर्धा प्रकल्प २०९.८० द.ल.घ. (३७.२० टक्के), निम्न वर्धा प्रकल्प ६०.०१ द.ल.घ. (२७.६७ टक्के), बेंबळा प्रकल्प ७०.५० द.ल.घ. (२३.२९ टक्के) तर सुकळी लघु प्रकल्पात ६.१७ द.ल.घ. (६०.८ टक्के), पोथरा प्रकल्प ३३.९० द.ल.घ. (९७.६३ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे.(प्रतिनिधी)