शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न सुटला

By admin | Updated: September 18, 2014 00:02 IST

मुंबई हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव कडून आर्वीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे गेट वारंवार बंद राहत असल्यामुळे वाहनांना तासनतास ताटकळत राहावे लागत होते. मागील दोन दशकापासून येथे उड्डाणपूल व्हावा

प्रभाकर शहाकार - पुलगावमुंबई हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव कडून आर्वीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे गेट वारंवार बंद राहत असल्यामुळे वाहनांना तासनतास ताटकळत राहावे लागत होते. मागील दोन दशकापासून येथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी प्रवासी व नागरिकांमधून केली जात होती. परंतु उड्डाणपुलाची जागा निश्चित होत नसल्याने हा प्रलंबित होता. पण आता हा प्रश्न निकाली लागला असून येत्या दोन वर्षात हा उड्डाणपूल तयार होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता नरेंद्र बोरकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.या उड्डाणपुलामुळे शहरातील बाजारपेठेवर संक्रांत येण्याच्या भीतीमुळे या पुलाच्या कामास बराच विरोध झाला. त्यामुळे या पुलाची जागा निश्चित होत नव्हती. काही पर्यायही सुचविण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या पुलाच्या जागेविषयी व त्यामुळे व्यापार संकुलाचे होणारे नुकसान लक्षात घेता कॉटन मील व बस आगाराच्या मधून हा मार्ग काढून रेल्वे गेटच्या जागेवर हा उड्डाण पूल होण्याचे संकेत मिळाले आहे. बस आगाराजवळून हा मार्ग पंचधारा रोड व पुढे नागपूर मुंबई द्रुतगती मार्गाला जोडल्या जाणार आहे. या भव्य पुलावर एकूण ४५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी राज्यशासनाचा वाटा ३५ कोटीचा तर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा १० कोटीचा वाटा राहणार आहे.या बांधकामास राज्य शासनाने नियोजन प्रकरण क्र. ६७९ नियोजन ३ दि. २७ मे २०१४ पुरवणी अर्थ संकल्पात नव्याने समाविष्ठ करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या निधीची तरतुद केली आहे. राज्यशासनासह रेल्वे मंत्रालयानेही या पुलाच्या नकाशासही मान्यता दिली आहे. पुलाच्या बांधकामाच्या निविदा ही काढण्यात आल्या असून हा उड्डाणपूल जवळपास दोन ते अडीच वर्षात पूर्ण केल्या जाईल अशी माहितीही बोरकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.