मुस्लीम कार्यकर्त्यांचा ओवेसींच्या विरोधात निषेध मोर्चा

By Admin | Updated: March 20, 2016 02:14 IST2016-03-20T02:14:16+5:302016-03-20T02:14:16+5:30

अस्सोद्दीन ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आपततीजनक वक्तव्याविरूद्ध भाजप युवा मोर्चाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांची शनिवारी निषेध मोर्चा काढला.

Protest Against Osgi of Muslim Workers | मुस्लीम कार्यकर्त्यांचा ओवेसींच्या विरोधात निषेध मोर्चा

मुस्लीम कार्यकर्त्यांचा ओवेसींच्या विरोधात निषेध मोर्चा

आर्वी : अस्सोद्दीन ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आपततीजनक वक्तव्याविरूद्ध भाजप युवा मोर्चाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांची शनिवारी निषेध मोर्चा काढला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी एमआयएमचे अस्सोद्दीन ओवेसी यांनी माझ्या मानेवर जरी सुरा ठेवला, तरी मी ‘भारत माता की जय नाही म्हणणार’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ शनिवारी भाजयुमोच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांच्या नेतृत्वात अटलबिहारी वाजपेयी उद्यान येथून इंदिरा चौक मार्गे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. ओवेसींवर देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी मागणी तहसीलदार मनोहर चव्हाण यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आले. तत्पूर्वी आम्ही भारतीय नागरिक आहोत आणि आम्हाला ‘भारत माता की जय’ असे म्हणायला कधीच लाज वाटली नाही तर आम्ही गार्वाने ‘भारत माता की जय’ म्हणतो. यामुळे ओवेसी यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आम्हा मुस्लीम बांधवांना दु:ख झाले. त्याचा आम्ही निषेध नोंदवितो, असे मत मुस्लीम कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी भाजयुमो उपजिल्हा प्रमुख अरसलान खान, मिलिंद हिवाळे, विनुभाष डोळे, जोशी, शिंगाने, सुधीर जाचक, मेहबूब खा, पुनीत छांगाणी, अनिस खान, अफसर खॉ, जमीर अहमद, अज्जू भाई अंसारी, रामू राठी, नजिर भाई कादरी यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Protest Against Osgi of Muslim Workers