शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्क्यांकरिता अध्यक्षपदावर नजरा

By admin | Updated: February 8, 2015 23:36 IST

शासकीय योजना राबविताना आलेल्या निधीतील १० टक्के वाटा योजनेकरिता निवड झालेल्या भागातील लोकप्रतिनिधीचा, असा अलिखित नियमच झाला आहे.

पाणी पुरवठा समितीच्या गठणात गोंधळ : योजनेकरिता जिल्ह्यातील ५८ गावांची निवड वर्धा : शासकीय योजना राबविताना आलेल्या निधीतील १० टक्के वाटा योजनेकरिता निवड झालेल्या भागातील लोकप्रतिनिधीचा, असा अलिखित नियमच झाला आहे. याच १० टक्क्यांचा लाभ मिळण्याकरिता सध्या जिल्ह्यात गोंधळ सुरू आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीकरिता गठित होणाऱ्या समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे ठरणार आहे. हेच अध्यक्षपद आपल्याला मिळावे याकरिता समितीच्या गठणाकरिता होणाऱ्या ग्रामसभेत वाद होवून सभा तहकूब होत आहेत. जिल्ह्यातील गावांगावात नागरिकांना पाणी मिळावे याकरिता केंद्र शासनाच्यावतीने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील ५८ गावांत ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना तिचे सर्व अधिकारी योजना राबविणाऱ्या समितीला देण्यात आले आहे. तसे शासनाचे आदेशही आहेत. याच कारणाने निवड झालेल्या गावात ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभा घेत पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे गठण करण्यात येत आहे. योजनेच्या सर्व्हेसह त्याचा आराखड तयार करणे व ती राबविण्याकरिता लागणारा खर्च समितीलाच ठरवावयाचा आहे. समितीने केलेल्या सूचनेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कारणाने समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे ठरत आहे. अध्यक्षपद आपल्याकडेच असावे याकरिता गावातील काही लोकप्रतिनिधीत रस्सीखेच सुरू आहे. ग्रामसभेत समितीच्या सदस्यांची निवड झाल्यावर अध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीची वेळ आल्यावर वाद झाल्याच्या घटना घडत आहे. याचे ताजे उदाहरण नाचणगाव येथील ग्रामसभा ठरत आहे. नाचणगाव येथील सिद्धधेश्वर मंदिरात शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी) झालेल्या सभेत सदस्यांच्या निवडीपर्यंत सर्वकाम सुरळीत सुरू होते. अध्यक्ष व सचिवाच्या निवडीची वेळ येताच सदस्य आमने-सामने आले. यावेळी सदस्यांत चांगलीच हमरी-तुमरी झाली. सदस्यांत असलेला हा वाद निपटने कठीण होत असल्याने अखेर ही सभा तहकूब करण्यात आली. असे या गावात दोन वेळा घडले. जिल्ह्यातही हिच परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)योजनेचे सर्व अधिकार समितीला निवड झालेल्या गावात पाणी पुरवठा योजना राबविताना तिचे सर्वस्वी अधिकार गठित झालेल्या समितीला देण्यात आले आहे. या समितीच्या ठरावानुसार काम होणार आहे. गावात योजना राबविताना सर्व्हे करण्यापासून तर त्याकरिता लागणारा खर्च व काम करणाऱ्या कंत्राटदाराची निवड हिच समिती करणार आहे. यात शासनाचे अभियंता केवळ गावाने ठेवलेल्या ठरावात दिलेल्या योजनेवर किती खर्च येईल याची माहिती देतील. यामुळे योजना राबविताना समितीचा अध्यक्ष हुकमी एक्का ठरणार आहे. समितीच्या गठणाची जबाबदारी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर निवड झालेल्या गावात ग्रामसभेतून ही समिती गठित करण्याची जबाबदारी त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. समितीचे अध्यक्षपद लाभाचे ठरणार असल्याने या समितीचे गठण करणे या अधिकाऱ्यांकरिता अडचणीचे ठरत आहे.