शिक्षकाला विद्यार्थ्यांकडून प्रसाद

By Admin | Updated: December 6, 2014 00:21 IST2014-12-06T00:21:48+5:302014-12-06T00:21:48+5:30

सेलसूरा येथील शेतकी शाळेतील विद्यार्थिनीसोबत मागील तीन वर्षांपासून अश्लील वार्तालाप व शरीर सुखाची मागणी करणाऱ्या मद्यधुंद शिक्षकाला ...

Prasad by the students from the teacher | शिक्षकाला विद्यार्थ्यांकडून प्रसाद

शिक्षकाला विद्यार्थ्यांकडून प्रसाद

देवळी : सेलसूरा येथील शेतकी शाळेतील विद्यार्थिनीसोबत मागील तीन वर्षांपासून अश्लील वार्तालाप व शरीर सुखाची मागणी करणाऱ्या मद्यधुंद शिक्षकाला शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चोप देऊन देवळी पोलिसांच्या स्वाधीन केले. कृषी पदविका भाग १ च्या विद्यार्र्थिनीच्या तक्रारीवरून राजेश भाऊराव लांडगे (४५) रा. वर्धा याच्याविरूध्द भादंवि ३५४, ५०९, ५०७,८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. राजेशे हा सेलसूरा शाळेत लिपीक म्हणून कार्यरत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे लिपीक लांडगे हा शिकवणीचे काम करीत होता. केवळ तीनच शिक्षक येथे कार्यरत आहे. प्रात्यक्षिकातील गुणांचा धाक दाखवून तो विद्यार्थिनींना शरीर सुखाची मागणी करीत होता. तक्रार केल्यास नापास करण्याची धमकावणी करीत होता. फिर्यादी विद्यार्थिनीला लांडगे याने एकांतात चालण्यास सांगितले. तिने याला नकार दिला. तिने ही बाब घरी सांगितली असता तिच्या भावाने देवळी येथील संपर्क केला. शिवसेना पदाधिकारी अजिंक्य मोरके, निलेश बोलोटकार, खुशाल सफर, बंटी गेडाम आदी कार्यकर्ते शेतकी शाळेत गेले. यावेळी तो लिपीक मद्यधुंद अवस्थेत होता. शिक्षकाला देवळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Prasad by the students from the teacher