शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

डाळींब बाग केली पोपटांनी फस्त

By admin | Updated: May 22, 2016 01:55 IST

शेती करण्याची नवी ऊर्जा घेऊन पारंपरिक पिकांपासून फारकत घेत फळबागेकडे वळलेल्या युवा शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

लाखोंचे नुकसान : तीन वर्षांचे श्रम ठरले व्यर्थघोराड : शेती करण्याची नवी ऊर्जा घेऊन पारंपरिक पिकांपासून फारकत घेत फळबागेकडे वळलेल्या युवा शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. उत्पन्न हातात येण्याची वेळ आली असताना पोपटांनी डाळींबातील गरे खात झाडाला टरफल ठेवले. या प्रकारामुळे युवा शेतकरी हतबल झाला आहे. हिंगणी येथील अजय डेकाटे या युवकाने अभियांत्रिकी पदविका घेतल्यानंतर शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती करण्याचे ठरविले. यासाठी त्याने डाळींबाची फळबाग २०१३ मध्ये लावली. येथून तीन वर्षांनी हातात उत्पन्न येईल, ही अपेक्षा होती. फळबाग फुलली. तीन एकरांत ८०० डाळींबाची झाडे लावली. त्या प्रत्येक झाडाला ७० ते ७५ डाळींब लागले. एका डाळींबाचे वजन ७०० ते ८०० ग्रॅम होते. आजचा बाजारभाव पाहता एक डाळींब ८० ते ९० रुपयांत विकले गेले असते; पण ऐन डाळींब तोडणीची वेळ आली आणि पोपटाच्या थव्यांनी या डाळींब बागेवर बस्तान बसविले. या पोपटांनी शेतकऱ्याला मिळणाऱ्या १५ ते १७ लाखांच्या उत्पन्नावर घाला घातला. डाळींबातील गरे फक्त केली अन टरफले झाडाला ठेवली. नापिकी व कर्जबाजारीपणापासून मुक्तता मिळावी म्हणून निवडलेला मार्गही खडतर झाल्याचे दुख: उराशी बाळगून शासकीय यंत्रणेकडे मदतीसाठी धाव घेतली. वनविभाग, जिल्हाधिकारी, कृषी विभागाला निवेदन दिली. गत आठ दिवसांपासून हा युवा शेतकरी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे. ही फळबाग स्व-खर्चाने लावलेली असल्याने पहिल्याच उत्पन्नाच्या आशेवर पोपटांनी पाणी फेरले. या शेतकऱ्याच्या पाठोपाठ अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहे. कृषी विभाग तसेच मनरेगातून अनेकांनी फळबागा लावल्या; पण अशी संकटे आल्यास फळाचे संगोपण व रक्षण कसे करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शासनाने या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)