शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांमध्ये घमासान

By admin | Updated: November 20, 2014 22:56 IST

येत्या २३ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या पिपरी (मेघे) जि.प. गटाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये मतांचे चांगलेच घमासान होणार असल्याचे चित्र आहे. यामध्ये काही

वर्धा : येत्या २३ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या पिपरी (मेघे) जि.प. गटाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये मतांचे चांगलेच घमासान होणार असल्याचे चित्र आहे. यामध्ये काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीला रंगत आणली आहे. यामुळे नेमकी बाजी कोण मारणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहेत.भाजपाच्या तिकीटावर मागील निवडणूक जिंकलेले पिपरी(मेघे) गटातील जि.प. सदस्य श्याम गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली होती. यामुळे त्यांनी पक्षाच्या सदस्य तसेच जि.प. सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपसह राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण नऊ जण निवडणूक रिंगणात आपले राजकीय भवितव्य आजमावत आहे. जिल्हा परिषदेत भाजपची अल्प बहुमतात सत्ता आहे. भाजपकडून अविनाश देव रिंगणात आहे. भाजपला एकेका जागेचे महत्त्व आहे. त्यामुळे ही जागा भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही चांगलीच कंबर कसली आहे. राष्ट्रवादीकडून प्रमादे दांदडे निवडणूक लढत आहे. काँग्रेसने अमित गावंडे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे, तर शिवसेनेने अविनाश भांडे यांच्यावर बाजी लावली आहे. यासोबतच विविध राजकीय पक्षांचा अनुभव असलेले संजय शिंदे अपक्ष म्हणून ही निवडणूक लढत आहे. या पाच उमेदवारांमध्ये खरी लढत असली तरी पहिल्या क्रमांकावर कोण राहील, याची गणिते येथील नागरिक जुळवत आहे. भाजप ही निवडणूकदेखील नरेंद्र मोदी यांच्याच नावावर लढत आहे. सध्याची महाराष्ट्राची राजकीय स्थिती विचारात घेऊनच जनता मतदान करतील, असे बोलले जात आहे. तेव्हा विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे बघण्यासारखे असेल.(जिल्हा प्रतिनिधी)