शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांना जागेचे कायम पट्टे द्या

By admin | Updated: June 11, 2016 02:31 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत झोपडपट्टी बांधून राहत असलेल्या रहिवाशांना कायमस्वरुपी जागेचे पट्टे देण्यात यावे,

मागणी : शासकीय उदासीनता कारणीभूतवर्धा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत झोपडपट्टी बांधून राहत असलेल्या रहिवाशांना कायमस्वरुपी जागेचे पट्टे देण्यात यावे, अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्यावतीने करण्यात आली. देवळी तालुक्यातील सरुळ, लोणी तसेच सेलू येथील हमदापूर ग्रा.पं. तील शासकीय जागेवर अतिक्रमण करुन राहत असलेल्या झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न त्वरीत निकाली काढण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे व महिला जिल्हाध्यक्ष हिरा खडसे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.झोपडपट्टीवासियांना नियमित करुन त्यांना जागेचे पट्टे देण्याची गरज आहे. आर्थिक स्थिती नसल्याने शासकीय जमिनीवर त्यांना झोपडपट्टी बांधून राहावे लागत आहे. गोरगरीब जनतेकरिता शासनाकडून विविध योजना सुरू केल्या. मात्र याच लाभ यांना मिळत नाही. झोपडपट्टी बांधून राहत असल्याने ते कायमस्वरुपी रहिवासी नसतात. तसेच ती शासनाची जमीन असल्याने योजनेचा लाभच दिला जात नाही. झोपडपट्टी अतिक्रमीत केलेल्या जनतेला न्याय मिळावा. त्यांचे राहते घर नावाने पक्के पट्टे मिळावे म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल(सरकारी जमिनीचे विल्हेवाट लावणे) नियम १९७१ च्या नियम क्र. ४५ नुसार झोपडपट्टी निवास अतिक्रमण करणारा मागासवर्गीय असेल तर नियम ४५ प्रमाणे ती जमीन विनामुल्य प्रदान करण्यात यावी, असा स्पष्ट उल्लेख दि. ४ एप्रिल २००२ च्या शासन निर्णय परिपत्रकात आहे. दि. १ जानेवारी १९९५ पासून अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टयांना नियमित करा असेही यात म्हटले आहे. त्यानुसार ग्रा.पं. सरुळ, ग्रा.पं. लोणी, ग्रा.पं. हमदापुर या तिन्ही ग्रा.पं. ना याचा लाभ देण्याची मागणी निवेदनातून केली. १९९५ पूर्वीपासून या तिन्ही गावातील झोपडपट्टीवासीय याचे लाभार्थी आहे. यापूर्वी तहसिलदारांना येथील रहिवासी असल्याचे ठराव देऊन ते सिद्ध करण्यात आले. तरीही ही समस्या कायम आहे.(स्थानिक प्रतिनिधी)