नियमित कर अदा करणाऱ्यांनाही दंड

By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:37+5:302016-04-03T03:51:37+5:30

आर्थिक वर्ष संपत असल्याने नगर पालिकेच्या कर विभागात कराचा भरणा करणाऱ्यांची मोठी गर्दी होती. यात काही नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्यात आल्याचे समोर आले.

Penalties for regular tax payers | नियमित कर अदा करणाऱ्यांनाही दंड

नियमित कर अदा करणाऱ्यांनाही दंड

नगर पालिकेचा अफलातून कारभार
वर्धा : आर्थिक वर्ष संपत असल्याने नगर पालिकेच्या कर विभागात कराचा भरणा करणाऱ्यांची मोठी गर्दी होती. यात काही नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्यात आल्याचे समोर आले. हा प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. परिणामी, नियमित कर अदा करणाऱ्यांनी दंड का भरावा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पालिका प्रशासनाकडून विविध करांची आकारणी केली जाते. यात शैक्षणिक, वृक्ष, स्वच्छता आदी करांचा समावेश आहे. या कराचा भरणा ३१ मार्चपूर्वी करणे अनिवार्य आहे. अन्यथा महिन्याकाठी दोन टक्के दंड आकारला जात आहे. अनेक नागरिक ३१ मार्चंपर्यंत नियमित कराचा भरणा करतात. यामुळे त्यांना दंड आकारणी होणे अपेक्षित नाही; पण मागील वर्षी नियमित कराचा भरणा करूनही दंडाची रक्कम करपत्रात लागून आले. यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे. नियमित कर अदा करूनही दंड लावला जात असल्याने पालिका प्रशासनास विचारणा करण्यात आली. यानंतर ही चुक निदर्शनास आल्याने नियमिंत कर अदा करा व दंडाची रक्कम देऊ नका, असे सांगण्यात आले. पालिकेच्या या अफलातून प्रकारामुळे नागरिक मात्र संतप्त झाले होते.(कार्यालय प्रतिनिधी)

रकमेचे समायोजन करणार
कराची रक्कम उशीरा भरणाऱ्यांना दंडाची रक्कम आलेली असू शकते. असे एक-दोन जणांसोबत घडले असण्याची शक्यता आहे. चुकीने लागून आलेल्या दंडाच्या रकमेचे समायोजन करण्यात येणार असल्याचे कर विभागाचे अधिकारी जगताप यांनी सांगितले.
सुविधांचा अभाव
नियमित कर अदा करणाऱ्यांनाही दंडाची रक्कम लागून आल्याचे निदर्शनास आले. पालिकेकडून शैक्षणिक, वृक्ष, स्वच्छता कराची आकारणी केली जाते; पण आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाही. वृक्ष लागवड केली जात नाही. नियमीत करदात्यांना दंड आकारणे योग्य आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Penalties for regular tax payers