शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे नुकसान पाहून शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: July 29, 2014 23:58 IST

शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा शेतातील नुकसान पाहून ‘ब्रेनहॅमरेज’ने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास बरबडी शिवारात घडली. या घटनेमुळे गावात

बरबडी येथील घटना : कर्जाचीही होती चिंतावर्धा : शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा शेतातील नुकसान पाहून ‘ब्रेनहॅमरेज’ने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास बरबडी शिवारात घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे़ चंद्रहास मुडे (५४) रा. बरबडी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. यंदा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागत आहे़ चंद्रहास मुडे यांनाही शेतात बराच पैसा खर्च करावा लागला. असे असताना पीक पाहीजे तसे उगवले नाही. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पिकांची पाहणी करण्याकरिता चंद्रहास मुडे हे शेतात गेले; पण शेतातील पिकांची वाईट स्थिती पाहून त्यांना अस्वस्थ वाटू लागले़ यातच आणखी नुकसान होणार आणि कर्जाचा डोंगर वाढणार, या चिंतेने त्यांना भोवळ आली व ते शेतातच पडले. ही बाब लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना उपचारार्थ त्वरित सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले; पण उपचार सुरू असतानाच त्यांचा ब्रेनहॅमरेजने मृत्यू झाला. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांची स्थिती दयनिय आहे. लावलेला खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेने घर केले आहे़ शासनाने भरीव मदत करण्याची मागणी होत असताना शेतकऱ्याच्या कुटुंबालाही आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.(शहर प्रतिनिधी)