शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारी म्हणते, जिल्ह्यात सुकाळ

By admin | Updated: October 17, 2015 02:49 IST

जाहीर झालेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील एकाही गावात दुष्काळ नसल्याचे समोर आले आहे.

नजरअंदाज पैसेवारी जाहीर : सोयाबीन गेले, कपाशीचे उत्पन्न घटण्याची चिन्हेवर्धा: जाहीर झालेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील एकाही गावात दुष्काळ नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६५ असल्याचे दर्शविण्यात आले आहे. वास्तवात चित्र मात्र उलट आहे. शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षेनुसार कोणतेही उत्पन्न येण्याची शाश्वती नाही. नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या सुधारीत पैसेवारीत तरी हे चित्र पालटेल, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न निघण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या तोंडावर काढण्यात येत असलेल्या सोयाबीनने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळविल्या. एकरी एक ते दीड पोते उतारी मिळाल्याने लागवडीकरिता लागलेला खर्चही निघताना दिसत नाही. उशिरा पाऊस आल्याने पेरण्या लांबल्या. अशात पुन्हा पावसाने दडी मारली. यामुळे सोयाबीनची वाढ खुंटली. दरम्यान, पिके मरणासन्न अवस्थेत असताना पाऊस आला. यामुळे पिके वाचली; मात्र पुन्हा मारलेल्या दडीमुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. परिणामी नगदी पीक असलेल्या सोयाबीनने ऐनवेळी शेतकऱ्यांना दगा दिला. अशीच अवस्था कपाशीची झाली आहे. कपाशी पात्यांवर असताना आलेल्या पावसामुळे पात्या गळाल्या. यानंतर पुन्हा पाऊस आला नाही. यामुळे गत महिन्यात आलेला पाऊस कपाशीकरिता तारक ठरणार असे म्हणताना तो मारक ठरला. आज कपाशीची अवस्था बिकट आहे. जमिनीतील उष्णतेमुळे झाडे करपत आहेत. सोबतीला विविध रोगांचा प्रादुर्भाव आहेतच. यामुळे कपाशीकडूनही शेतकऱ्यांना आता विशेष आशा राहिल्या नाहीत. असे असताना जिल्ह्यात ५० च्या वर निघालेली पैसेवारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी अशीच आहे. यावर मार्ग काढण्याकरिता जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग राबविण्याची मागणी काही शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे. यात जर जिल्ह्याची पैसेवारी ५० च्या आत आली तर शेतकऱ्यांना मदत मिळणे सोपे होईल. यामुळे सुधारीत पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस तरीही जमिनी कोरड्याचजिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जलसाठे भरले असले तरी जमिनीची धूप शांत झाली नाही. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पामध्ये विक्रमी जलसाठा निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तरी शेतीचा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात ६६.६४ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद गत वर्षीच्या तुलनेत १० टक्के अधिक झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा पाऊस अधिक असला तरी तो पिकांकरिता लाभदायक नसल्याने दिसून आले आहे. या पावसामुळे जमिनची धूप शांत झाली नसल्याने उष्णतेमुळे पिकांची स्थिती दयनिय झाली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने तापमाणामुळे पीक करपत असल्याचे चित्र आहे. सोयाबीनला एकरी दीड पोत्यांचा उतारा जिल्ह्यात यंदाच्या हंगामात मध्यंतरी सोयाबीनची स्थिती पाहून चांगले उत्पन्न होईल, असे वाटत होते. पीक पाहून शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र मध्यंतरी पावसाने मारलेल्या दडीमुळे शेंगा भरल्या नसल्याने उत्पन्न हातचे गेल्याचे दिसून आले आहे. अशीच अवस्था कपाशीची आहे. कपाशीचे पिकही हातेचे जाण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात अशी स्थिती असताना शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यात नुकसान नसल्याचे दाखविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.