शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पाटसऱ्या बुजल्या, ओलीतास अडथळा

By admin | Updated: November 6, 2014 02:10 IST

अप्पर वर्धा धरण अंतर्गत, उर्ध्व वर्धा डावा कालवा, कडा पाटसऱ्या विभाग हे दरवर्षी रब्बी पिकांसाठी ओलीत करायला पाणी सोडतात.

अमोल सोटे आष्टी(शहीद)अप्पर वर्धा धरण अंतर्गत, उर्ध्व वर्धा डावा कालवा, कडा पाटसऱ्या विभाग हे दरवर्षी रब्बी पिकांसाठी ओलीत करायला पाणी सोडतात. यासाठी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी आकारणीही केली जाते. परंतु शेतकऱ्यांना सुविधा मिळतातच असे नाही. यावर्षी पाणी सोडण्यापूर्वी कालवे व पाटसऱ्या साफ करण्यात आल्या नसल्याचे प्रत्यक्ष पाहणी केली असता आढळून आले. त्यामुळे सोडलेले पाणी शेतात कमी आणि वायाच जास्त जात आहे. साफसफाई करणारे पगारी कर्मचारी ड्यूटी सोडून टाईमपास करण्यात व्यस्त असल्याचे वास्तवही ‘आॅन दी स्पॉट’ पाहणी केली असता आढळून आले. आष्टी(श.) तालुक्यासाठी तळेगाव (श्या.पं.) येथे दोन कार्यालय कार्यरत आहे. कालव्यासाठी आणि पाटसऱ्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. या अंतर्गत १२ हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित राहते. धरणात १०० टक्के पाणीसाठा असल्यामुळे मुबलक पाणी शेतकऱ्यांना मिळण्याची आशा होती. त्यासाठी कालवे विभागाचे उपविभागीय अभियंत्रा व्ही.एम. गावंडे, कडा विभागाचे उपविभागीय अभियंता पी. पी. पोटफोडे यांनी पाणीवाटप संस्थाचे अध्यक्ष, सदस्य यांसोबत सभा घेवून नियोजन केले. यासंबंधी कार्यरत साफसफाई कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली. मात्र अद्यापही कालव्याची व पाटसऱ्याची सफाई झाली नाही. गाजरगवत, बाभळीची झुडप वाढली आहेत. पाण्यासोबत वाहत येणारा कचरा साचल्याने शेताजवळ आलेले पाणी भलतीकडेच वाहत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली त्यांच्या शेताजवळही अद्यापही पाणी पोहचले नाही. अनेक शेतकऱ्यांनी चोरीच्या मार्गाने पाणी घेतले आहे. त्यांना साफसफाई कर्मचारी चिरीमिरी घेवून मदत करीत असल्याचा अआरोप होत आहे. अधिकाऱ्यांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पाहणीत समोर आले.आष्टी, तळेगाव, भारसवाडा, लहान आर्वी, अंतोरा, साहूर या भागात मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. पण राबविणारी यंत्रणा कमी पडत असल्यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. यावर्षी खरिपावर आधारित सोयाबीन पीक पूर्णत: बुडाले. शेतकऱ्यांनी वातावरणात आर्द्रता नसल्याने हरभरा, गहू, पिकांची पेरणी कमी प्रमाणात केल्या जात आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सुविधा आहे. त्यांना पीक येण्याची हमी आहे. मात्र ओलितासाठी लागणारे पाणी शेतापर्यंत पोहचत नसल्याने अनेक शेतकरी चिंतीत आहे. आमदार अमर काळे यांनी अप्पर वर्धा धरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. सद्यस्थितीत धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातील ३० टक्के पाण्याची चोरी होत आहे. ३० टक्के पाणी अस्वच्छतेमुळे वाया जात आहे, तर थोड्याशा पाण्यावर पिकांना ओलित करावे लागत आहे. सोबतच आष्टी तलाव, मलकापूर तलावांतर्गत असणारे कालवे व पाटसऱ्याची अद्याप सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. शासनाने बांधकामावर कोट्यावधी रूपयांचा खर्च केला. परंतु देखभाल व संरक्षणात कुचराई होत असल्यामुळे मूळ उद्देश अपूर्ण रहात आहे. आर्वी व आष्टी तालुक्यात सारखीच स्थिती आहे. शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी केली तरच याचा फायदा होणार आहे. तसे होताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.