व्याघ्रदर्शनामुळे चिकणीत दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी) : मागील वर्षी दिवाळीच्या पूर्वी आपल्या सुरक्षीत अधिवासाच्या शोधात निघालेल्या वाघाचे दर्शन देवळी तालुक्यातील ...

Panic | व्याघ्रदर्शनामुळे चिकणीत दहशत

व्याघ्रदर्शनामुळे चिकणीत दहशत

Next
ठळक मुद्देवनविभागाची चमू घटनास्थळी : प्रत्यक्षदर्शीसोबत साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : मागील वर्षी दिवाळीच्या पूर्वी आपल्या सुरक्षीत अधिवासाच्या शोधात निघालेल्या वाघाचे दर्शन देवळी तालुक्यातील काही ग्रामस्थांना झाले होते. तो पट्टेदार वाघ सध्या वर्धा जिल्ह्यात नसला तरी रविवारी चिकणी शेत शिवारात काही नागरिकांना व्याघ्र दर्शन झाले. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय प्रत्यक्षदर्शीयांशी संवाद साधला. अखेर सदर वन्य प्राणी वाघ नसून तडस असावा या निकषावर वनविभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. असे असले तरी या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवळी-पुलगाव मार्गावर एका ऑटो चालकासह दोन दुचाकी चालकांना वाघ सदृष्य वन्यप्राणी शेत शिवारात दिसून आला. त्यानंतर शेतात वाघ असल्याची वार्ता वाऱ्यासारचीच परिसरात पसरली. बघता बघता बर्घ्यांचीही एकच गर्दी झाली. दरम्यान घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, एस. आर. परडके, शेख, स्विटी दांडगे, विनोद सोनटक्के यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. त्यावेळी कुठल्याही वन्यप्राण्याचे पगमार्क त्यांना विठ्ठल बेलसरे यांच्या शेताच्या आवारात दिसून आले नाही. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी प्रविण कांबळे यांच्यासह इतर काहींशी संवाद साधला. वाघ, बिबट, तडस यांचे छायाचित्र दाखवून त्यांना विचारपूस करण्यात आली. या संपूर्ण चौकशीदरम्यान सदर वन्यप्राणी वाघ किंवा बिबट नसून तडस असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. असे असले तरी ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चिकणीसह परिसरातील नागरिकांना केले आहे.

Web Title: Panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.