शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात पुन्हा दिसू लागणार फळबागा

By admin | Updated: August 24, 2014 23:40 IST

पारंपारिक पिके घेताना शेतीतील उत्पन्न वाढावे या हेतूने शेतकरी फळबागा लावण्याकडे वळल्याचे चित्र तालुक्यात दिसू लागले आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मिळत असल्याने तालुक्यात पुन्हा फळबागा फुलणार असल्याचे

विजय माहुरे - घोराडपारंपारिक पिके घेताना शेतीतील उत्पन्न वाढावे या हेतूने शेतकरी फळबागा लावण्याकडे वळल्याचे चित्र तालुक्यात दिसू लागले आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मिळत असल्याने तालुक्यात पुन्हा फळबागा फुलणार असल्याचे चित्र आहे. सेलू तालुका हा केळी बागायतदारांचा तालुका म्हणून विदर्भात ओळखला जात होता; मात्र अलीकडच्या काळात दीड वर्षाचे असलेले पण महागडे असलेले पीक अन् केळीला उत्पादन खर्चानुसार योग्य भाव मिळत नसल्याने सध्या तालुक्यात नावापुरत्याच केळीच्या बागा शिल्लक राहिल्या आहेत. शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गत तीन वर्षांपासून फळ लागवड कार्यक्रम राबविला जात आहे. तालुका कृषी विभाग व पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत ही योजना कार्यान्वित होत आहे. शेताच्या बांधावर फळबाग ही योजना तालुका कृषी विभागांतर्गत राबविली पण याला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे बोलल्या जात आहे.शेतात फळबाग योजना यासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी फळबाग लावण्यासाठी अर्ज केले आहेत. सेलू पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये २२-२३ हेक्टर २०१३-१४ मध्ये ४२ हेक्टर तर २०१४-१५ मध्ये ११६ हेक्टरचे उद्दीष्ट ठरविले आहे. हे उद्दीष्ट शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वाढू शकले. तालुक्यात आतापर्यंत १८० हेक्टरच्या आसपास ही लागवड होत आहे.यात तीन वर्षांपर्यंत संत्रा-मोसंबी व लिंबू यासाठी एक लाख ११ हजार तर डांळींबासाठी एक लाख १३ हजार रुपयांचे अनुदान सफाई, खड्डे, कलमा आणणे, पाणी, खत व मशागतीकरिता मिळणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना कलमा (रोपे) पंचायत समिती कार्यालयातून देण्यात येत आहे. बोरधरण, काटोल व शेंदूरजनाघाट येथून ही रोपे आणली आहे. यात डाळींब, संत्रा, मोसंबी, लिंबू, आवळा व सिताफळ या कलमांचा समावेश आहे. फळाच्या कलमा शेतकऱ्यांना देण्यात आल्या यावेळी कृषीअधिकारी एन. आर. कीटे, कृषी विस्तार अधिकारी मनोज नागपुरकर, बी. बी. बिल्लेवार, तांत्रीक अधिकारी योगेश रोडे, नितिन कांबळे यांचे सहकार्य मिळत आहे.