शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषणला विरोध

By admin | Updated: May 6, 2015 00:03 IST

बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला.

संभाजी ब्रिगेडची शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शनेवर्धा : बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. पुरंदरेंनी छत्रपती शिवरांयाचा खरा इतिहास दडपून बहुजन समाजामध्ये तेढ निर्माण करणे व मुस्लिम समुदायाला शत्रूपक्षात उभे करण्याचे आयुष्यभर काम केले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करून पुरास्कारासह राज्याची शान घालवू नका, अशा तीव्र शब्दांत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी निषेध नोंदविला. दरम्यान छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करून सरकारविरूद्ध घोषणाबाजी केली.छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी जीवनचरित्रावर लेखन करण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या विविध पैलूंवर सखोल संशोधन करून बहुजन समाजातील संशोधक नव्याने खऱ्या इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम समुदायाविरूद्ध उभे करून इतिहास लेखन केले, असा आरोप या संघटनांनी केला. त्यामुळे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास नव्या पिढीपुढे मांडण्यात त्यांचे कोणतेही योगदान नाही. राज्य शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करून इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांना पाठबळ दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.या विरोधात संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य शासनाचा निषेध करून पुरंदरे यांना पुरस्कार देऊ नये, अशी मागणी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)