शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आयातीत उमेदवारांनाही जनतेद्वारे संधी

By admin | Updated: October 19, 2014 23:59 IST

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचाराचा पगडा होता़ शिवाय काँगे्रसविरोधी लाट होती़ विधानसभा निवडणुकीतही ही लाट कायम राहील, असे वाटत होते़ यामुळे अनेकांनी काँग्रेस,

वर्धा : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचाराचा पगडा होता़ शिवाय काँगे्रसविरोधी लाट होती़ विधानसभा निवडणुकीतही ही लाट कायम राहील, असे वाटत होते़ यामुळे अनेकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे सोडून भाजपामध्ये प्रवेश घेतला़ वर्धा जिल्ह्यातही आयातीत दोन उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनीच भाजपाची लाज राखली़ प्रस्थापित माजी खासदार व विद्यमान आमदारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले तर आयातीत उमेदवारापैकी हिंगणघाटमध्ये कुणावार यांनी मताधिक्याने विजय मिळविला. वर्धेतही भोयर यांनी समाधानकारक मते घेत विजयाची माळ गळ्यात घालून घेतली़वर्धा विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार डॉ़ पंकज भोयर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपामध्ये प्रवेश केला़ लोकसभा निवडणुकीत माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांचा पराभव झाला़ यानंतर सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याच्या कारणावरून दत्ता मेघे यांनी काँगे्रसचा त्याग करून भाजपाला जवळ केले़ त्यांच्यासोबतच युवक काँगे्रसमध्ये सक्रीय असलेल्या डॉ़ पंकज भोयर यांनीही कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता़ हिंगणघाट विधानसभा मतदार संघातही उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वी समीर कुणावार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला़ भाजपानेही विजयाची खात्री लक्षात घेत वर्धा मतदार संघात डॉ़ पंकज भोयर तर हिंगणघाटमध्ये समीर कुणावार यांना उमेदवारी बहाल केली़ यातील हिंगणघाट मतदार संघात गत निवडणुकीत ४१ हजारांवर मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या कुणावार यांना पक्षाचे बळ मिळताच त्यांनी भरारीच घेतली़ यंदाच्या निवडणुकीत त्यांनी ८९ हजार ९१२ मते घेत तब्बल ६५ हजार २५ मतांनी विजय मिळविला़ मुख्य राजकीय पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या मतांपर्यंतही पोहोचता आले नाही़ बसपाचे उमेदवार प्रलय तेलंग यांनी २४ हजार ८८७ मते घेतली़ वर्धा विधानसभा मतदार संघातही डॉ़ भोयर यांना भाजप पदाधिकाऱ्यांची विशेष साथ मिळाली नसताना ४५ हजार ६५० मते घेत ८ हजार ५३० मतांनी विजय मिळविला़ एकूण वर्धा जिल्ह्यातही आयातीत उमेदवारांना मतदारांनी संधी दिली़(कार्यालय प्रतिनिधी)