शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकावर वृद्ध दाम्पत्याला लुटले

By admin | Updated: August 5, 2015 02:14 IST

मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरलेल्या चार अज्ञात इसमांनी चाकूच्या धाकावर वृद्ध दाम्पत्याला लुटले.

आरोपी चार : पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास वर्धा : मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरलेल्या चार अज्ञात इसमांनी चाकूच्या धाकावर वृद्ध दाम्पत्याला लुटले. यात सोन्याचे दागिने व रोख हजार रुपये, असा एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना आर्वी तालुक्यातील बारेगाव (हातला, पुनर्वसन) येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून मंगळवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव (हातला) (पु.) येथील विश्वास शिरपूरकर (८०) हे त्यांच्या कुटुंबीयांसह गाढ झोपेत असताना त्यांच्या घराच्या मागील दारातून चार अज्ञात इसम आत शिरले. शिरपूरकर यांना काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आल्याने या चार अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांना गप्प बसण्यास सांगितले. या चोरट्यांनी शिरपूरकर दाम्पत्याला धमकावणी करून घरातील दागिने, पैसे व मुल्यवान वस्तूंबाबत विचारणा केली. शिरपूरकर यांनी जीवाच्या भीतीने त्यांना सर्वच माहिती दिली. या चोरट्यांनी त्यांच्या घरातील लोखंडी कपाटातील सोन्याच्या पाटल्या (सात तोळे), पोथ (एक तोळा), बांगड्या (तीन तोळे) असे दागिने तर रोख एक हजार रुपये घेवून चोरट्यांनी पळ काढला. हा सर्व प्रकार मंगळवारी मध्यरात्री १ ते ३ वाजताच्या सुमारास घडला. याप्रकाराने शिरपूरकर दाम्पत्य घाबरले होते. सकाळ झाल्यावर या चोरीची तक्रार आर्वी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तक्रारीवरून चार अज्ञात इसमावर कलम ३९२, ४५८ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास आर्वी पोलीस करीत आहे. या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांच्या हाती अद्याप कुठलाही सुगावा लागला नाही. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.(स्थानिक प्रतिनिधी)