शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परखाली आल्याने वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

किसना नारायण गाडगे (७०) रा. चिंचोली (शिंगरु) असे मृताचे नाव आहे. ते गावातील दिनेश किशोर गायकवाड (२३) याच्यासोबतच एम. एच.३२, एम.५२२९ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाटच्या स्टेट बँकेत होते. शहरातील रेल्वे उड्डाणपूल उतरल्यानंतर तुकडोजी पुतळ्यापासुनच्या मुख्य रस्त्याचे सिमेटिकरण व पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम सुरु असल्याने ऐकरी वाहतूक आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये रोष : कामाच्या संथगतीने घेतला वृद्धाचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील स्टेट बँकेमध्ये निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी दुचाकीवर बसून जात असताना दुचाकी घसरुन पडली. त्यामुळे टिप्परच्या मागच्या चाकाखाली येऊन वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजतादरम्यान शहरातील मुख्य मार्गावर घडली. रस्त्याच्या संथगतीने सुरु असलेल्या बांधकामामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.किसना नारायण गाडगे (७०) रा. चिंचोली (शिंगरु) असे मृताचे नाव आहे. ते गावातील दिनेश किशोर गायकवाड (२३) याच्यासोबतच एम. एच.३२, एम.५२२९ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाटच्या स्टेट बँकेत होते. शहरातील रेल्वे उड्डाणपूल उतरल्यानंतर तुकडोजी पुतळ्यापासुनच्या मुख्य रस्त्याचे सिमेटिकरण व पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम सुरु असल्याने ऐकरी वाहतूक आहे.गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे संथगतीने काम सुरु असल्यामुळे नेहमीच अपघात होत आहे. सध्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल झाला आहे. या एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्याने सकाळी एम.एच. १६ सी.ए.०३३२ क्रमांकाचा टिप्परही याच मार्गाने आला. त्यामुळे दिनेशची दुचाकी घसरुन पडल्याने दोघेही विरुद्ध दिशेने फेकल्या गेले. यात किसना गाडगे हे टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची हिंगणघाट पोलिसांनी नोंद घेतली असून घनश्याम लांडगे व विशाल ढेकले पुढील तपास करीत आहे.तुकडोजी पुतळा चौक ते सुभाष चौकापर्यंतच्या चौपदरी रस्त्याच्या सिमेंटिकरणाचे काम नियोजनशुन्य व ढिसाळपणे सुरु असल्यामुळेच किसना गाडगे या वृद्धाचा बळी गेला आहे. या रस्त्यावर दररोज अपघात होत असून आणखीही किती व्यक्तीना जीव गमवावे लागणार, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला.

टॅग्स :Accidentअपघात