शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणास्थळातून ओबीसींचे जनआंदोलन

By admin | Updated: August 19, 2014 23:53 IST

ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करावी तसेच अन्य सुविधा द्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी जनआंदोलन उभारण्यात येत आहे़ विदर्भातील ओबीसींच्या या जनआंदोलनास महात्मा गांधी

सेवाग्राम : ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करावी तसेच अन्य सुविधा द्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी जनआंदोलन उभारण्यात येत आहे़ विदर्भातील ओबीसींच्या या जनआंदोलनास महात्मा गांधी आश्रमातून प्रारंभ करण्यात आला़ यावेळी सरपंच रोशना जामलेकर यांना निवेदन देण्यात आले़ सरपंचामार्फत मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे़यावेळी प्रा़ दिवाकर गमे म्हणाले की, महात्मा फुले समता परिषदेने आता ओबीसींच्या न्याय्य हक्काची लढाई खेड्यापाड्यातून सुरू केली आहे़ ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जनगनना व अन्य मागण्यांची जाणीव, माहिती झाल्याने या आंदोलनात ते सक्रीय झालेत़ यात एस़सी, एस़टी़, प्रमाणे घरकूल, शेती अवजारे, मिनी ट्रॅक्टर, विहिरी आदी १०० टक्के अनुदानावर मोफत मिळाली पाहिजे़ एवढेच नव्हे तर ओबीसी बारा बलुतेदार, लोहार, सुतार, शिंपी, कुंभार, न्हावी, परिट आदींनाही त्यांच्या व्यवसायासाठी १०० टक्के अनुदानावर मोफत साहित्य मिळावे, विद्यार्थ्यांना बिनव्याजी व ७० टक्के अनुदानावर प्रत्येकी १० लाख रुपये व्यवसायासाठी कर्ज मिळाले पाहिजे़ ग्रामीण युवक युवतींना एसटी, एससीप्रमाणे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिले पाहिजे़ ग्रामीण प्रशिक्षित ओबीसींना ५० लाख रुपये बिनव्याजी कर्ज ६० टक्के अनुदानावर दिले पाहिजे, असे सांगितले़ सुनील राऊत यांनी, मागील दोन वर्षांपासून ओबीसींच्या मागण्यांबाबत आंदोलने करण्यात येत आहे़ ही लढाई आता मागण्या पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही़ विविध संघटनांचे पाठबळ लाभले़ आश्वासन मिळतात; पण आता जन आंदोलनाची गरज आहे़ नव्या पिढीच्या भविष्याचा प्रश्न यातून सुटणार आहे, असे सांगितले़ किशोर माथनकर यांनी ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत़ आर्थिक स्थिती नाजूक असून आजचे शिक्षण खर्चिक आहे़ आर्थिक दुर्बलतेमुळे शिक्षण घेणे कठीण झाले आहे़ यामुळे संघटनांच्या मागण्या रास्त व योग्य असून त्या पूर्ण होणे गरजेचे आहे़ यासाठी आंदोलनाद्वारे जनजागरण करून त्या मान्य करून घेणे आवश्यक आहे, असे सांगितले़ काकडे यांनी ओबीसींची जनगनणा, घटनात्मक अधिकार व सवलती यासाठी आंदोलने उभारली, निवेदने दिलीत़ लोकप्रतिनिधींनी याचे गांभीर्य समजावून घेतले पाहिजे़ शासन आश्वासन देते, घोषणा करते; पण योग्य कारवाई करीत नसल्याने दिशाभूल करीत असल्याची भावना वाढीस लागते़ यातूनच समाजात उद्रेक निर्माण होतो़ न्याय हक्काचा विचार झाला पाहिजे़ मागण्या पूर्ण व्हाव्या, असे नमूद केले़ यावेळी सुनील राऊत, किशोर माथनकर, प्रा़ दीवाकर गमे, विनय डहाके, निळकंठ पिसे, अविनाश काकडे, सुनील कोल्हे, सुरेश बुरडकर, संजय जवादे व पदाधिकारी उपस्थित होते़(वार्ताहर)