शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आता फळ पिकांनाही विमा संरक्षण

By admin | Updated: January 31, 2015 01:55 IST

जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात संत्रा, कारंजा व आष्टी तालुक्यात मोसंबी आणि सेलू तालुक्यातील झडशी येथे केळी पिकांसाठी हवामान ..

वर्धा : जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात संत्रा, कारंजा व आष्टी तालुक्यात मोसंबी आणि सेलू तालुक्यातील झडशी येथे केळी पिकांसाठी हवामान आधारीत फळ पीक विमा योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. गारपीट या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ यासाठी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत विमा काढता येणार आहे़वर्धा जिल्ह्यात संत्रा, मोसंबी आणि केळी फळ पिकांना १५ जानेवारी ते १५ एप्रिल २०१५ पर्यंत गारपीट या हवामान धोक्यापासून संरक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत विमा प्रस्तावानुसार देय होणारी नुकसान भरपाई पूर्णपणे संबंधित विमा कंपनी शेतकऱ्यांना परस्पर अदा करणार आहे. फळ पिकाचा विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांनी गारपीट झाल्यानंतर ४८ तासांच्या आत संबंधित बँकेला, विमा कंपनीला आणि कृषी विभागाला त्वरित कळविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी फळ पिकाचा विमा उतरविल्यानंतर विम्याची रक्कम विमा कंपनीला पाठविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहणार आहे़ वेळेवर विमा प्रस्ताव बँकेकडून सादर न झाल्यास नुकसान भरपाई संबंधित संस्था अदा करील. हवामान आधारीत फळ पीक विमा योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे़संत्रा फळपिकासाठी आर्वी तालुक्यातील आर्वी, रोहणा, खरांगणा आणि वाठोडा, कारंजा तालुक्यामध्ये कारंजा, ठाणेगाव, सारवाडी आणि कन्नमवारग्राम तर आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव येथील बागायतदार शेतकरी फळ पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत़ शिवाय मोसंबी फळपिकांसाठी कारंजा तालुक्यामध्ये कारंजा, ठाणेगाव, सारवाडी व कन्नमवारग्राम, आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव आणि केळी पिकांसाठी सेलू तालुक्यातील झडशी या महसूल मंडळामधील शेतकरी हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत़ खरीप आणि रबी हंगामातील पिकांसाठी प्रायोगिक तत्वावर राबविलेली ही पीक विमा योजना आता फळ पिकांनाही लाभदायक ठरणार, असे चित्र आहे़(कार्यालय प्रतिनिधी)