शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

आता एका केंद्रावरून १५० लाभार्थींना मिळेल व्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 05:00 IST

राज्य शासनाकडून कोविशिल्डचे पाच हजार डोस मिळाल्याने सुरुवातीला महात्मा गांधी लेप्रेसी फाउण्डेशन वर्धा, टाका ग्राऊंड नागरी प्राथमिक केंद्र, हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय, पुलगाव, ग्रामीण रुग्णालय, कारंजा, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी जिल्ह्यात या पाच केंद्रांवरून  रविवार, २ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याची माेहीम सुरू करण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी शुक्रवारी जिल्ह्यात आणखी तीन केंद्रांची पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींसाठी राज्य शासनाने वर्धा जिल्ह्यासाठी कोविडच्या लसीचे आठ हजार डोस उपलब्ध करून दिल्याने या लाभार्थींसाठी शुक्रवारी तीन नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना आता एकूण आठ केंद्रांवरून कोविडचे व्हॅक्सिन दिले जात आहे. बऱ्यापैकी लस साठा मिळाल्याने आता प्रत्येक केंद्रावरून दररोज १८ ते ४४ वयोगटातील १५० लाभार्थींना लस मिळणार आहे.राज्य शासनाकडून कोविशिल्डचे पाच हजार डोस मिळाल्याने सुरुवातीला महात्मा गांधी लेप्रेसी फाउण्डेशन वर्धा, टाका ग्राऊंड नागरी प्राथमिक केंद्र, हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय, पुलगाव, ग्रामीण रुग्णालय, कारंजा, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी जिल्ह्यात या पाच केंद्रांवरून  रविवार, २ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याची माेहीम सुरू करण्यात आली आहे. तर गुरुवारी कोव्हॅक्सिनचे आठ हजार डोस वर्धा जिल्ह्याला मिळाल्याने शुक्रवारपासून ग्रामीण रुग्णालय सेलू, ग्रामीण रुग्णालय, समुद्रपूर व ग्रामीण रुग्णालय, आष्टी हे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करीत शड्यूल घेतलेल्यांनाच या केंद्रांवरून कोविडची लस दिली जात आहे. 

नवीन केंद्रांवर उस्फूर्त प्रतिसादशुक्रवारी जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आणखी तीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी लाभार्थ्यी स्वयंर्स्फूतीने ऑनलाईन नाेंदणी करीत शड्यूल घेत कोविडची प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आले होते. आष्टीत पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस