आता एका केंद्रावरून १५० लाभार्थींना मिळेल व्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 05:00 IST2021-05-08T05:00:00+5:302021-05-08T05:00:07+5:30

राज्य शासनाकडून कोविशिल्डचे पाच हजार डोस मिळाल्याने सुरुवातीला महात्मा गांधी लेप्रेसी फाउण्डेशन वर्धा, टाका ग्राऊंड नागरी प्राथमिक केंद्र, हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय, पुलगाव, ग्रामीण रुग्णालय, कारंजा, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी जिल्ह्यात या पाच केंद्रांवरून  रविवार, २ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याची माेहीम सुरू करण्यात आली आहे. 

Now 150 beneficiaries will get the vaccine from one center | आता एका केंद्रावरून १५० लाभार्थींना मिळेल व्हॅक्सिन

आता एका केंद्रावरून १५० लाभार्थींना मिळेल व्हॅक्सिन

ठळक मुद्दे१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी शुक्रवारी जिल्ह्यात आणखी तीन केंद्रांची पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींसाठी राज्य शासनाने वर्धा जिल्ह्यासाठी कोविडच्या लसीचे आठ हजार डोस उपलब्ध करून दिल्याने या लाभार्थींसाठी शुक्रवारी तीन नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना आता एकूण आठ केंद्रांवरून कोविडचे व्हॅक्सिन दिले जात आहे. बऱ्यापैकी लस साठा मिळाल्याने आता प्रत्येक केंद्रावरून दररोज १८ ते ४४ वयोगटातील १५० लाभार्थींना लस मिळणार आहे.
राज्य शासनाकडून कोविशिल्डचे पाच हजार डोस मिळाल्याने सुरुवातीला महात्मा गांधी लेप्रेसी फाउण्डेशन वर्धा, टाका ग्राऊंड नागरी प्राथमिक केंद्र, हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय, पुलगाव, ग्रामीण रुग्णालय, कारंजा, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी जिल्ह्यात या पाच केंद्रांवरून  रविवार, २ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याची माेहीम सुरू करण्यात आली आहे. 
तर गुरुवारी कोव्हॅक्सिनचे आठ हजार डोस वर्धा जिल्ह्याला मिळाल्याने शुक्रवारपासून ग्रामीण रुग्णालय सेलू, ग्रामीण रुग्णालय, समुद्रपूर व ग्रामीण रुग्णालय, आष्टी हे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करीत शड्यूल घेतलेल्यांनाच या केंद्रांवरून कोविडची लस दिली जात आहे.
 
नवीन केंद्रांवर उस्फूर्त प्रतिसाद
शुक्रवारी जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आणखी तीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी लाभार्थ्यी स्वयंर्स्फूतीने ऑनलाईन नाेंदणी करीत शड्यूल घेत कोविडची प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आले होते. आष्टीत पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.
 
Web Title: Now 150 beneficiaries will get the vaccine from one center