शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या विमुक्त जाती अन्नसुरक्षेपासून वंचित

By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST

प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केली. या योजनेचा लाभ द्रारिद्रय रेषेतील अंत्योदय

वायगाव (नि.) : प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केली. या योजनेचा लाभ द्रारिद्रय रेषेतील अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकाना मिळणे गरजेचे असतानाही बहुतांश भटक्या जाती जमातीच्या लोकांकडे शिधापत्रिका नसल्याने ते अन्न सुरक्षेपासून वंचित ंआहेत.भटक्या समाजातील बंजारा, गोसावी, गाडी लोहार, गोपाळा, नाथजोगी, बहुरूपी, गवळी, नदीवाले, लोहार, भाविष्य सांगणारे, झाडपत्ती विकणारे, गारूडी अशा अनेक भटक्या समाजातील नागरिकांकडे शिधापत्रिका नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या या योजनेपासून नाईलाजाने दूर राहावे लागले. भटक्या समाजातील नागरिकांना मिळणार्‍या सोई-सुविधा आणि सवलती, आरोग्य सुविधापासून हे समाज वंचित आहे.  ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्याना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे शक्य नसल्याने त्यांचा नाईलाज आहे. भटक्या समाजातील नागरिकांची स्थिती ही अतिशय वाईट आहे. सतत भटकत असल्याने त्यांना सहन शिधापत्रिका मिळत नाही. तसेच हे नागरिक शिधापत्रिका बनविण्यासाठी गेल्यास त्यांना कागदपत्रांअभावी परत पाठविले जाते. परिस्थिती हलाखीची असल्याने अशा जमातीतील नागरिकांना या योजनेचा लाभ मिलणे अत्यावश्यक आहे. शासनाने अशा गरीब लोकांसाठीच ही योजना सुरू  केली आहे. परंतु त्यांनाच मुलभूत हक्कापासून दूर रहावे लागत असल्याने शासनाच्या या योजनेचा मूळ हेतूच दूर सारला जात आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देवून भटक्या जातीच्या नागरिकांना योजनेचा लाभ व मुलाना शिक्षणासाठी उपाय म्हणून सर्वप्रथम त्यांच्या शिधापत्रिका बनविणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)