शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: "अमेरिका-इस्रायलचे हे वागणे इराणी जनता स्वीकारणार नाही", राष्ट्रपती पेझेश्कियान यांचे विधान
3
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
4
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
5
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
6
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
7
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
8
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
9
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
10
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
11
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
12
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
13
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
14
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
15
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
16
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
18
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
19
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
20
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या रक्षणार्थ वृक्ष लागवड आवश्यक

By admin | Updated: June 20, 2016 01:58 IST

राज्यात १ जुलै २०१६ या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे.

रामदास तडस : दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्पवर्धा : राज्यात १ जुलै २०१६ या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेकरिता वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. या वृक्ष लागवडीकरिता सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच वैयक्तिक या सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले. वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. जागतिक तापमान व प्रदूषणात होणारी वाढ यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हवामान, ऋतू बदल व त्यातून वारंवार उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई यांची दाहकता व परिणामकारकता कमी करण्याचे मोठे आव्हान असल्याचेही खा. तडस यांनी नमूद केले आहे. सध्या पर्यावरण धोक्यात आले, अशा प्रकारची हाकाटी सतत ऐकत असतो; पण पर्यावरणाची बिघडलेली परिस्थिती सुधारणे कसे शक्य होईल, ती सुधारणा कशी करायची, याबद्दल कुणी फारसे बोलताना दिसत नाही. बिघडलेल्या पर्यावरणात सुधारणा करणे शक्य आहे काय, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. महाराष्ट्र शासनाचे पाऊल पर्यावरणाचे रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण एक रोपटे लावले तर ते ५० वर्षांपर्यंत आपल्याला १७.५० लाख रुपयांचे आॅक्सीजन, ४१ लाख रुपयांचे पाण्याचे रिसायकलींग, ३५ लाख रुपयांचे प्रदूषणावर नियंत्रण, दरवर्षी ३ किलो कार्बनडाय आॅक्साईड शोषण करते. ३ टक्के तापमान कमी करते. यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड केली तर ते वृक्ष ५० वर्षे पर्यावरणाला मदत करतील. एक वृक्ष एवढी मदत करतो तर महाराष्ट्रात दोन कोटी वृक्ष लावल्यावर राज्य प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाने झाडे लावण्याचा संकल्प करावा, राज्य शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प बळकट करावे, असे आवाहनही खा. तडस यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)