शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

बापूंचा जाहिरनामा स्वत: राबविण्याची गरज

By admin | Updated: August 11, 2015 03:01 IST

आश्रमात राहण्याचा आणि महापुरुषांचा सहवास लाभला. ‘हिंद स्वराज्य’ तीनदा वाचण्याचा प्रयत्न केल्यांनतर आता मात्र

अभय बंग यांचे विचार : सेवाग्राम आश्रमात क्रांतिदिनी व्याख्यानसेवाग्राम: आश्रमात राहण्याचा आणि महापुरुषांचा सहवास लाभला. ‘हिंद स्वराज्य’ तीनदा वाचण्याचा प्रयत्न केल्यांनतर आता मात्र सदर पुस्तक समजू लागले. महात्मा गांधीजींनी १९०९ मध्ये हे पुस्तक लिहिले. जगातील एकंदरीत भांडवलशाही, हिंसा, पाश्चिमात्य संस्कृतीच्या भयानकतेचे दुष्परिणाम गांधीजींनी ओळखले होते. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील जाहिरनामा साकार करण्याची व्यक्तिगत पातळीवरुन सुरुवात व्हावी. जगात परिवर्तन व्हावे असे वाटत असले तरी स्वत:पासून याचा प्रारंभ केल्यास बापूंच्या जाहिरनाम्याची सुरुवात झाली, असे समजायला हरकत नाही, असे विचार डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. यात्री निवासमध्ये भारत छोडो आंदोलन दिवसावर ‘हिंद स्वराज्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एकनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी व्याख्याते डॉ. बंग, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, मंत्री प्रा. डॉ. जाधव व गांधी विचार परिषदेचे भरत महोदय उपस्थित होते. मान्यवरांनी गांधीजींच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण केल्यानंतर प्रा. श्रीराम जाधव यांनी सूतमाळ व खादीची शाल देवून डॉ. बंग व प्रा. एकनाथ रोडे यांचे स्वागत केले.