भौतिकता, अध्यात्माचा स्वीकार करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:34+5:30

स्थानिक संत गजानन महाराज मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. सकाळी कावड यात्रेने पवनारच्या नदीवरून आणलेल्या पवित्र तीर्थाने श्रीं चा अभिषेक करून संस्थेचे विश्वस्त ज्ञानेश्वर पहाडे यांच्याहस्ते कलश स्थापना करण्यात आली. दुपारी ३ वाजता भागवत कथेला प्रारंभ झाला.

The need to accept materiality, spirituality | भौतिकता, अध्यात्माचा स्वीकार करण्याची गरज

भौतिकता, अध्यात्माचा स्वीकार करण्याची गरज

ठळक मुद्देसंत गजानन महाराज मंदिरात भागवत कथेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मानवी जीवनात सुख, समाधान, शांती टिकऊन ठेवायची असेल, तर भौतिकतेसह अध्यात्माचाही स्वीकार करा. भावनाशुन्य जीवन जगणे निरर्थक आहे. मानवाने २१ व्या शतकात विकासाचे शिखर गाठले तरी सुख आणि समाधानापासून आजही तो वंचीत आहे. मानव अविकसीत अवस्थेतही रडत होता आणि विकसीत अवस्थेतही अश्रू ढाळतोय, असे मार्गदर्शन स्वामी सारंग चैतन्य महाराज यांनी केले.
स्थानिक संत गजानन महाराज मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. सकाळी कावड यात्रेने पवनारच्या नदीवरून आणलेल्या पवित्र तीर्थाने श्रीं चा अभिषेक करून संस्थेचे विश्वस्त ज्ञानेश्वर पहाडे यांच्याहस्ते कलश स्थापना करण्यात आली. दुपारी ३ वाजता भागवत कथेला प्रारंभ झाला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष मोहन अग्रवाल, शेखर शेंडे, शालीग्राम टिबडीवाल, सुधाकर बोकारे, तुळशीराम जुनारे, सुशील व्यास, प्रकाश रायटर यांच्याहस्ते ग्रंथपुजन करण्यात आले. यासंगीतमय कथेत महाराजांना आॅर्गन वादक अंकुश ठाकरे, तबला वादक प्रफुल्ल सरदार, रूपेश खोडे, गजानन गायकवाड, मोहन लाडेकर, गायक दिगांबर ठाकरे साथ संगत देत आहेत. सारंग चैतन्य महाराज म्हणाले की, भागवत कथेत जीवनाचे सार समाविष्ट आहे.
समाजात विभिन्न धर्म, संप्रदायात नाव वेगवेगळे असले तरी देव एकच आहे. प्रत्येक घटनेमागे ईश्वरी शक्ती कार्य करीत असल्याचे सांगून पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत महामय व गोकर्णाच्या कथेवर त्यांनी प्रकाश टाकला. १५ रोजीपर्यंत दररोज दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The need to accept materiality, spirituality