शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

नऊ भरारी पथकांची कृषी केंद्रांवर करडी नजर

By admin | Updated: May 31, 2014 23:40 IST

यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांच्या असलेल्या तुटवड्यामुळे बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यावर लगाम लावण्याकरिता जिल्ह्यात एकूण नऊ पथक तयार करण्यात आले

वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांच्या असलेल्या तुटवड्यामुळे बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यावर लगाम लावण्याकरिता जिल्ह्यात एकूण नऊ पथक तयार करण्यात आले असून ते पथक जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी करणार आहे. यात एक जिल्हास्तरावर तर आठ पथके तालुका स्तरावर कार्यरत राहणार आहेत. खरिपात कापाशीचा पेरा वाढणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात कपाशिच्या बियाण्यांची एकूण ८.२१ लाख पाकीटे आवश्यक आहेत. असे असले तरी जिल्ह्यात आजच्या घडीला अर्धेच बियाणे उपलब्ध आहे. येत्या एक दोन दिवसात जिल्ह्यात बियाणे येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.  सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडाही यंदाही जानवणार आहे. यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या घरी असलेल्या बियाण्यांचा वापर करण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत. जिल्ह्यात नियोजित असलेल्या पेर्‍याकरिता १.0८ लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. या दोन्ही पिकांच्या बियाण्यांचा आज तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे येणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यातून होणारा काळाबाजार रोखण्याकरिता जिल्ह्यात नऊ पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. शिवाय शेतकर्‍यांना कुठे कोणती अडचण निर्माण झाल्यास त्या कृषी विभागाला पुरविण्याकरिता एक तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आली आहे. या  केंद्रावर संपर्क साधत शेतकर्‍यांनी त्यांच्या तक्रारी सादर करण्याच्या सूचना आहेत. (प्रतिनिधी)