शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक वास्तूला उकिरड्याचे स्वरुप

By admin | Updated: November 22, 2014 23:07 IST

येथील भोसलेकालीन अतिप्राचीन सराय सध्या कचरा साठविण्याचे ठिकाण होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची

नाचणगाव : येथील भोसलेकालीन अतिप्राचीन सराय सध्या कचरा साठविण्याचे ठिकाण होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. किल्ल्याच्या वास्तुसारखी दिसणारी ही सराय ऐतिहासिक आठवणींना उजाळा देते. ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या वास्तूला काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याने बागेचे स्वरूप दिले होते. यामध्ये विविध प्रकारची झाडे लावून सर्वांचे लक्ष वेधले होते; परंतु त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे डोळेझाक केली. सध्या या ऐतिहासिक वास्तूत कचरा पसरला आहे. आज सर्वत्र स्वच्छता अभियान सुरू असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र त्यापासून दूर असल्याचे चित्र आहे. या वास्तूच्या दारातच कचऱ्याचे ढीग पडून दिसत आहे. वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वत्र कचरा दिसून येतो. जिल्ह्यात पुरातन वास्तू तशा कमी आहेत. त्यात गावातील अतिप्राचीन वास्तू म्हणजे गावाचे वैभव ठरत आहे. अशा वैभवाची दुरवस्था ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. तरी ग्रा.पं. प्रशासनाने याची त्वरीत दखल घेवून स्वच्छता करण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून स्वच्छता अभियानाचे सार्थक होईल. ही वास्तू स्वच्छ करून येणाऱ्या जाणाऱ्यांकरिता ती पाहण्याकरिता खुली करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)