शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीमुळे चार व्यक्तींसह सहा प्राण्यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

सततच्या पावसामुळे तालुक्यातील ८६ घरांची पडझड झाल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. या नुकसानग्रस्तांपैकी काहींना १७ लाख ५८ हजारांची शासकीय मदत देण्यात आली आहे, तर ७९ लाख २३ हजारांचा निधी अद्यापही मिळालेला नसल्याने नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या उसंत घेत पाऊस सुरू आहे. अशातच सोयाबीन उत्पादकांकडून सोयाबीनच्या मळणीला गती दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : यंदाच्या वर्षी नैसर्गिक आपत्तीने तालुक्यातील शेतकऱ्यांसह पशुपालकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसामुळे १०१८ हेक्टरवरील उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून, तालुक्यातील चार व्यक्तींचा, तसेच सहा पाळीव प्राण्यांचा यंदाच्या वर्षी नैसर्गिक आपत्तीने बळी घेतला आहे, तर सततच्या पावसामुळे तालुक्यातील ८६ घरांची पडझड झाल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. या नुकसानग्रस्तांपैकी काहींना १७ लाख ५८ हजारांची शासकीय मदत देण्यात आली आहे, तर ७९ लाख २३ हजारांचा निधी अद्यापही मिळालेला नसल्याने नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या उसंत घेत पाऊस सुरू आहे. अशातच सोयाबीन उत्पादकांकडून सोयाबीनच्या मळणीला गती दिली जात आहे. पण पावसामुळे यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात घट येण्याची भीती वर्तविली जात असल्याने सोयाबीन उत्पादकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे.

मृतांसह जखमींच्या कुटुंबियांना मदत- तालुका प्रशासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमुळे गतप्राण झालेल्या चार व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले आहे, तर वीज पडून एक व्यक्ती जखमी झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना ४ हजार ३०० रुपये तातडीची मदत देण्यात आली आहे. - २५ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्या कुटुंबाला शासकीय मदत म्हणून १.२५ लाख वितरित करण्यात आले आहे. पावसामुळे पाच घरांचे पूर्णत: नुकसान झाल्याने या कुटुंबीयांना २९ हजार ७०० रुपये वितरित करण्यात आले आहे.

सहा घरांचे पूर्णत: तर ८० घरांचे अंशत: नुकसान- तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे चार व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. तर सहा घरांचे पूर्णतः तसेच ८० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच पाच  गोठे  पूर्णतः पडल्याने शेतीला पशूपालनाची जोड देणाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसामुळे १८४५ शेतकऱ्यांच्या १०१८.६३ हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे ७१.१४ लाखांची मागणी करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती