शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

स्थानिक जयभीम वॉर्ड भागातील मागील परिसरात राहणाऱ्या वसंता आत्राम याच्या घरालगत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर अल्लीपूरचे ठाणेदार योगेश कामाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी, जमादार संजय रिठे, संजय वानखेडे, पिसे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

ठळक मुद्देआरोपीस अटक । दगडाने केले वार, अल्लीपुरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला स्थानिक पोलिसांनी अटक केली असून ही घटना शनिवारी सकाळी स्थानिक जयभीम वॉर्डात उघडकीस आली. हमीद पठाण (३३) रा. अल्लीपूर, असे मृताचे नाव आहे. आरोपीने क्रूरपणे दगडाने ठेचून त्याला जीवानिशी ठार केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.स्थानिक जयभीम वॉर्ड भागातील मागील परिसरात राहणाऱ्या वसंता आत्राम याच्या घरालगत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर अल्लीपूरचे ठाणेदार योगेश कामाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी, जमादार संजय रिठे, संजय वानखेडे, पिसे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृतदेहाची बारकाईने पाहणी केल्यावर मृत हमीद याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या. हमीद पठाण हा मागील काही वर्षांपासून समुद्रपूर तालुक्यातील एका गावात पत्नीसह राहात होता. परंतु, मुळ गाव असलेल्या अल्लीपुरात त्याचे येणे-जाणे सुरू होते. शुक्रवारी तो अल्लीपूर येथे त्याच्या भावाकडे आला होता. अशातच त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाचे चक्रफिरवित संशयित आरोपी म्हणून वसंता आत्राम याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर वसंत आत्रामला याला अल्लीपूर पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Murderखून