शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मृतांत वयाची साठी ओलांडलेले अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वर्धेकर अजूनही गाफिस असल्यागतचे चित्र बघावयास मिळत आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ३७१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी १६१ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मृतकांमध्ये सर्वाधिक वयाची साठी पार केलेल्यांचा समावेश आहे. असे असले तरी आतापर्यंत ३ हजार २७० व्यक्तींनी कोविडवर मात केली आहे.

ठळक मुद्देकोविडमुळे १६१ व्यक्तींचा मृत्यू : कोरोना महामारीबाबत वर्धेकर गाफिलच

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे शनिवारपर्यंत जिल्ह्यातील १६१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात वयाची साठी ओलांडलेल्यांचाच सर्वाधिक समावेश आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे वयाचे अर्धशतक पूर्ण केलेल्यांनी सध्याच्या कोरोना काळात अधिक सतर्क आणि दक्ष राहण्याची गरज आहे.जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वर्धेकर अजूनही गाफिस असल्यागतचे चित्र बघावयास मिळत आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ३७१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी १६१ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मृतकांमध्ये सर्वाधिक वयाची साठी पार केलेल्यांचा समावेश आहे. असे असले तरी आतापर्यंत ३ हजार २७० व्यक्तींनी कोविडवर मात केली आहे. तर १ हजार ९४० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.सावधान; तरुणांना कोविड घेतोय कवेतजिल्ह्यातील कोविड बाधितांची गुरूवार ८ ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीवरून आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ० ते १० वयोगटातील ३.४६ टक्के व्यक्तींना, ११ ते २० वयोगटातील ७.३० टक्के व्यक्तींना, २१ ते ३० वयोगटातील २०.९२ टक्के व्यक्तींना, ३१ ते ४० वयोगटातील १८.८८ टक्के व्यक्तींना, ४१ ते ५० वयोगटातील १८.२५ टक्के व्यक्तींना, ५१ ते ६० वयोगटातील १६.२९ टक्के व्यक्तींना, ६१ ते ७० वयोगटातील ९.८१ टक्के व्यक्तींना, ७१ ते ८० वयोगटातील ४.१७ टक्के व्यक्तींना, ८१ ते ९० वयोगटातील ०.७४ टक्के व्यक्तींना, ९१ ते १०० वयोगटातील ०.०३ टक्के व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. यात सर्वाधिक कोविड बाधित तरुण असल्याने जिल्ह्यातील तरुणांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.दुपटीचा दर २८ दिवसांवरसप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील कोविड बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यावेळी जिल्ह्याच्या कोरोना दुपटीचा दर १० दिवसांवर पोहोचला होता. तर सध्या जिल्ह्याचा कोविड दुपटीचा पर २८ दिवसांवर आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.आतपर्यंत जिल्ह्यात १६१ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृताकांमध्ये वयाची साठी पार केलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वृद्धांनी सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात अधिक दक्षता बागळली पाहिजे. शिवाय नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.जिल्ह्याचा रिकव्हरी दर उत्तमदिवसेंदिवस कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी मोठ्या संख्येने वर्ध्यातील कोविडबाधित कोरोनावर मात करीत आहेत. सध्या जिल्ह्याचा कोविडमुक्तीचा दर ७० टक्के असून हा दिलासादायक आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू