शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

मान्सून लांबला; मृत जलसाठ्यावर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:14 PM

दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यातून शहराची तहान भागविणे प्रशासनालाही अडचणीचे ठरणार आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, आता ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी अवस्था निर्माण झाल्याने ही पाणीकोंडी फोडण्याकरिता मृत जलसाठ्याला हात घालावा लागणार आहे.

ठळक मुद्दे‘पाणी’ कोंडी : शहरात टँकरची मागणी वाढली, प्रशासनाचे नियोजन कोलमडले

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यातून शहराची तहान भागविणे प्रशासनालाही अडचणीचे ठरणार आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, आता ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी अवस्था निर्माण झाल्याने ही पाणीकोंडी फोडण्याकरिता मृत जलसाठ्याला हात घालावा लागणार आहे.वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे ११ तर लघू जलाशयाची संख्या २३ च्या घरात आहे. मागील वर्षीपर्यंत या जलाशयात बºयापैकी जलसाठा उपलब्ध असायचा. मोठ्या व मध्यम ११ जलाशयामध्ये आज केवळ ३५ दलघमी म्हणजेच ६.९१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवसापर्यंत या ११ ही जलाशयामध्ये तिप्पट म्हणजे १८.३५ टक्के (९५.४१ दलघमी) जलसाठा होता. यातून यावर्षीची पाण्याची भीषणता लक्षात येते. वर्धा शहरासह लगतच्या १३ ग्रा.पं. ला महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून पाणीपुरवठा केला जातो. धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा आणि वेळेवर मान्सून येईल या अपेक्षेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. आजच्या घडीला धाम प्रकल्पात २.८५ दलघमी पाणीसाठा असून उन्हाच्या तीव्रतेने तो झपाट्याने तळ गाठत आहे. आता पुन्हा शहरातील पाणीपुरवठाही प्रभावित झाला असून नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातही टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे.पाटबंधारे विभागाने मागितली परवानगीधाम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ६९.४३५ दलघमी असून त्यापैकी जीवंत साठा ५९.४८५ दलघमी तर मृतसाठा ९.९५ दलघमी आहे. यावर्षी अपुºया पावसामुळे धाम मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणी संचय झाला आहे. त्यामुळे आॅक्टोंबर २०१८ पासुनच बिगर सिंचनाकरिता धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. धरणात ९ मे २०१९ रोजी फक्त ६.०५ दलघमी जलसाठा उपलब्ध होता. मंडळ कार्यालयाने जानेवारी १९ ते मार्च १९ या तीन महिन्याचा पाणीवापर लक्षात घेता उर्वरित मे ते जून पर्यंत ८ दलघमी पाणी लागणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे ९ मे रोजी उपलब्ध ६.०५ दलघमी व उर्वरित कालावधीकरिता लागणारे पाणी ८ दलघमी याचा विचार करता २ ते ३ दलघमी पाण्याची तुट निर्माण होणार आहे. याचा विचार करता वर्धा नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पिपरी (मेघे) व शहराच्या सभोवतालच्या परिसरातील १३ गावे व इतर यंत्रणांना लागणाºया पिण्याच्या पाण्याची संभाव्य गरज भागविण्याकरिता धाम प्रकल्पाच्या मृत साठ्यातून ३ दलघमी पाणी वापर करण्याबाबत विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे परवानगी मागितली आहे.मोठे व लघू जलाशय कोरडेठाकजिल्ह्यात ११ मोठे व मध्यम जलाशय असून यापैकी पोथरा,पंचधारा, मदन, मदन उन्नई व सुकळी लघू प्रकल्प यांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. यासोबत कवाडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुºहा, रोठा-१, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवार, परसोडी, मलाकापूर, हराशी व टाकळी बोरखेडी या लघू प्रकल्पही कोरडेठाक असून सध्या केवळ ३.३७ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई