शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल धारकांच्या खिशाला झळ

By admin | Updated: October 29, 2014 22:55 IST

सध्या संपूर्ण नागरिकांना मोबाईल हा जीव की प्राण झाला आहे़ याचाच फायदा सिमकार्ड कंपन्यांनी घेतला असून अतिरिक्त सेवांचा भार ग्राहकांवर लादला जात आहे़ यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत

गिरड : सध्या संपूर्ण नागरिकांना मोबाईल हा जीव की प्राण झाला आहे़ याचाच फायदा सिमकार्ड कंपन्यांनी घेतला असून अतिरिक्त सेवांचा भार ग्राहकांवर लादला जात आहे़ यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत असल्याचे दिसून येत आहे़ ट्रायने याकडे लक्ष देत सिमकार्ड कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांद्वारे करण्यात येत आहे़ मोबाईल धारकांना सेवा देणाऱ्या सिमकार्ड कंपन्यांनी विविध योजनांची प्रलोभने देत ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार सुरू केला आहे़ एखाद्या योजनेच्या लोभाला पडून ग्राहक सेवा घेतात; पण जेव्हा बिल द्यावे लागते, तेव्हा कपाळावर हात ठेवतात़ मोबाईल सेवा पुरविणाऱ्या काही कंपन्या ग्राहकांच्या मोबाईलवर आपल्या मर्जीने अनेक सुविधा सुरू करीत आहे. ग्राहकांची परवानगी न घेता आपल्याकडील उपलब्ध सेवा बहाल करतात. यात डायलटोन, भजन, राशी-भविष्य, संगीत, क्रिकेट स्कोअर, इंटरनेट आदींचा समावेश आहे़ या सुविधा ग्राहकांना पूर्वसूचना न देताच सुरू केल्या जात आहेत़ यामुळे मोबाईल धारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे़ याबाबत ग्राहक सेवा केंद्रातून समाधानकारक उत्तरेही मिळत नसल्याने ग्राहकांद्वारे संताप व्यक्त केला जात आहे़ हा प्रकार जबरदस्तीचा असून कपात केलेली रक्कमही ग्राहकांना परत केली जात नाही़ एक-दोन दिवसांनी पैसे जमा होतील, असे सांगितले जाते; मात्र तसे घडताना दिसत नाही़ ग्रामीण भागात भारत संचार निगमची सेवा उत्तम असल्याने ग्राहकसंख्या अधिक आहे; पण या कंपनीच्या अतिरिक्त सेवा ग्राहकांच्या चुकीने एकदा सुरू झाल्या की, त्या बंद करण्याचा कुठलाही मार्ग ग्राहकांना उपलब्ध होत नाही. अखेर ग्राहकांना ते सिमकार्ड रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो़ असाच प्रकार अन्य खासगी सिमकार्ड कंपन्यांकडूनही केला जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे़ ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याच्या या प्रकारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते़ शहरी भागातील नागरिक असे कॉल वा मॅसेज आले तर ते उचलत नाहीत; पण ग्रामीण भागात याबाबत जागृती नसते़ यामुळे ग्रामस्थांच्या मोबाईलवरच या सेवांचा अधिक भार पडत असल्याचे दिसून येत आहे़ यावर नियंत्रणासाठी असलेल्या ट्रायचेही दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना मात्र मनस्ता सहन करावा लागतो़(वार्ताहर)