शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता झालेली युवती २० तासांनी परतली

By admin | Updated: November 4, 2014 22:44 IST

तालुक्यातील एका विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या वेळेत दुपारी २ वाजताचे दरम्यान काही संशयितांनी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने देवळी पोलिसात केली. मात्र सदर मुलगी २० तासानंतर परत आली.

युवतीच्या बयाणात तफावत : पोलिसांनी केली वैद्यकीय तपासणी देवळी : तालुक्यातील एका विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या वेळेत दुपारी २ वाजताचे दरम्यान काही संशयितांनी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने देवळी पोलिसात केली. मात्र सदर मुलगी २० तासानंतर परत आली. शिवाय तिला पोलिसांसमोर हजर केले असता ती आपले बयान बदलत असल्यामुळे चांगलाच गोंधळ माजला आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर विद्यार्थिनी बी.ए. भाग १ मध्ये शिकत असून सोमवारी दुपारी २ वाजता अचानक बेपत्ता झाली. मुलगी सायंकाळपर्यंत घरी परत न आल्यामुळे तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. यात चौकशीअंती काही युवकांनी तीला गाडीत कोंबून पळवून नेल्याचे उजेडात आले. यामुळे मुलीच्या आईच्या तक्रारीवरून संशयित म्हणून संगम खोडे रा. सिध्दार्थनगर, बोरगाव (मेघे) याच्यावर भांदवि ३६६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले; परंतु संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या संगम खोडे याचा यात काहीच दोष नसल्याचे समोर आल्याने त्याची सुटका करण्यात आली. दरम्यान मंगळवारी सकाळी १० वाजता अपहरण झालेल्या मुलीचा तिच्या आई-वडिलांना वर्धा येथून फोन आला. यात सांगितलेल्या ठिकाणावरून तीला सोबत घेवून देवळी पोलिसात आणण्यात आले. तोंडाला कापड बांधलेल्या ५ ते ६ युवकांनी मला देवळी येथे गाडीत कोंबून सेवाग्रामकडे पळवून नेल्याचे सदर युवतीने पोलिसांना सांगितले. सेवाग्राम उड्डाण पुलाच्या परिसरात सोमवारी मध्यरात्रीपर्यंत हे सर्व युवक माझे सोबत राहुन नंतर निघून गेले. त्यानंतर रात्रभर मी याच परिसरात फिरत होते. दरम्यान तिच्यावर कोणतीही जबरदस्ती झाली नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मुलीचे बयान विश्वासपात्र ठरत नसल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसून तो आल्यावरच यात काय आहे याचा खुलासा होईल असे पोलीस निरीक्षक वासेकर यांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास देवळी पोलीस करीत आहेत.(प्रतिनिधी)