नाली बांधकामात सिमेंटचा अत्यल्प वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:05+5:30

रस्त्याच्या बाजुच्या नाल्या बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेड काँक्रीटच्या गिट्टीत नाममात्र सिमेंट टाकून ओली गिट्टी नालीत पसरविण्याचे काम केले जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घोराड येथील नागरिकांनी केला आहे.

Minimal use of cement in drain construction | नाली बांधकामात सिमेंटचा अत्यल्प वापर

नाली बांधकामात सिमेंटचा अत्यल्प वापर

Next
ठळक मुद्देहिंगणा-सिरसगाव मार्गाचे काम : घोराडवासीयांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : हिंगणा-हिंगणी- घोराड- सेलू, मदनी- अल्लीपूर- कापसी- सिरसगाव या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. १०० कि़मी. लांबीचा हा मार्ग सर्वांसाठी सोयीचा ठरला आहे. या रस्त्याच्या बाजुच्या नाल्या बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेड काँक्रीटच्या गिट्टीत नाममात्र सिमेंट टाकून ओली गिट्टी नालीत पसरविण्याचे काम केले जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घोराड येथील नागरिकांनी केला आहे.
सदर मार्गाचे रुंदीकरण करुन दोन्ही बाजुला मोठ्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. या नालीसाठी तयार करण्यात येत असलेल्या गिट्टी व सिमेंटच्या मिश्रणात सिमेंट फक्त नावालाच टाकले जाते व ओली गिट्टी सर्रासपणे बेड काँक्रीटला वापरली जात आहे. याबाबत काही गावकऱ्यांनी ही बाब अधिकाºयांच्या लक्षात आणून दिली परंतु कुणी ऐकूण घ्यायला तयार नाही. या मार्गाची लांबी सुमारे शंभर कि़मी. आहे. राज्यशासन व ठेकेदार यांच्या ४० टक्के व ६० टक्के व निधीतून हे काम सुरू आहे. ठेकेदारांकडून प्रचंड गैरप्रकार या बांधकामात सुरू आहे. ठेकेदारावर लक्ष ठेवणारी सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा डोळयावर पट्टी बांधुन आले. घोराड गावाजवळ गैरप्रकार सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गुणनियंत्रण विभागाकडे झालेल्या कामाचे साहित्य खोदून तपासणीसाठी पाठवावे व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी घोराड गावात दोन्ही बाजूने क्रॉक्रींट नाली बांधण्यात आली. ती नाली प्रचंड उंच झाल्याने जुन्या रस्त्यालगतचे घर आता खाली गेले आहे. त्यांना नालीवरून उडी मारून घरात प्रवेश घ्यावा लागत आहे.

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट नाही
नागपूर जिल्ह्यापासून सुरू झालेल्या या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट बांधकामाबाबत तक्रारी आहेत. पण बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे या कामाला त्यांनी भेट दिली नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

घोराड जवळ नालीचे बांधकाम सुरू आहे. त्यात गिट्टीमध्ये केवळ नाममात्र सिमेंट वापरुन ओल्या गिट्टीचे बेड कॉक्रींट करणे सुरू आहे.याकडे संबधिताचे दुर्लक्ष होत आहे.
-अरविंद तडस, गावकरी, घोराड

Web Title: Minimal use of cement in drain construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.