शिथिलता पण, प्रशासनाकडून उपाययोजना कठोरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:00:12+5:30

शिथिलता दिल्यानंतर सर्व दुकानेही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरु आहे. उद्योग व्यवसायलाही चालना मिळाली आहे. निमशासकीय, खासगी व शासकीय कार्यालयातही कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. परिणामी रस्त्यावर किंवा बाजारपेठेत गर्दी होतांना दिसत आहे. बाहेर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्यांचेही प्रमाण वाढल्याने आता उपाययोजनांवर वॉच ठेवण्याचे निर्देश दिले आहे.

But the measures taken by the administration are harsh | शिथिलता पण, प्रशासनाकडून उपाययोजना कठोरच

शिथिलता पण, प्रशासनाकडून उपाययोजना कठोरच

ठळक मुद्देपुन्हा दंडात्मक कारवाईला गती : गृह विलगीकरणातून बाहेर पडणाऱ्यास दहा हजाराचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात नोकरीनिमित्त, खरेदीसाठी व कामासाठी घराबाहेर पडत आहे. बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातूनही जाणे-येणे करीत असल्याने कोविड-१९ चा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानमुळे प्रतिबंधक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे पुन्हा दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
शिथिलता दिल्यानंतर सर्व दुकानेही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरु आहे. उद्योग व्यवसायलाही चालना मिळाली आहे. निमशासकीय, खासगी व शासकीय कार्यालयातही कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. परिणामी रस्त्यावर किंवा बाजारपेठेत गर्दी होतांना दिसत आहे. बाहेर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्यांचेही प्रमाण वाढल्याने आता उपाययोजनांवर वॉच ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यामध्ये घराबाहेर पडणाºया व्यक्तीने मास्क घालणे.
दुकानांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करणे. भाजी बाजारात दुकानदारांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे तसेच ग्राहकांनीही सोशल डिस्टंन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करणे.
दुकान विहिती वेळेत उघडणे, बंद करणे तसेच दुकानात पर्याप्त सुविधा ठेवून दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे, गृह विलगीकरणातील व्यक्तीने नियमाचे पालन करुन घरातच राहणे, सक्षम अधिकाºयांची परवानगी घेऊन वाहतूक करणे, अनलोडिंग पॉइंटलाच वाहने थाबविणे व सोबतच्या व्यक्तीचा स्थानिक व्यक्तीशी संपर्क न होऊ देणे, या सूचनांचे पालन होते की नाही, याची तपासणी करुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कारवाईला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.

...तर दुकान होणार सात दिवसासाठी सील
मास्क न लावता फिरणाºयाला दोनशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. दुकानात गर्दी, पर्याप्त सुविधांचा अभाव तसेच विहित वेळेनंतर दुकान उघडे ठेवले तर पहिल्यांदा दोन दिवस आणि दुसºयांदा आढळून आल्यास सात दिवस दुकानांला सील लावले जाणार आहे.
गृह विलगीकरणातील व्यक्ती बाहेर आढळल्यास १० हजार रुपये दंड आकारल्या जाणार आहे. यासोबतच अवैध वाहतूक करणाºया व्यक्तीला १ हजाराचा दंड आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांचे वाहन जप्त करुन १ हजार रुपये दंड तर वाहनचालकाचा परवाना रद्द केला जाणार आहे.

मास्क न वापरणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईबाबत नव्याने आदेश पारित करताच शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला. निर्धारित वेळेपूर्वीच दुकान उघडणाऱ्या दहा दुकानांवर कारवाई करीत दुकाने सील केले. तसेच शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या ६० जणांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्या नावाची नोंदणी करुन त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी सांगितले.

Web Title: But the measures taken by the administration are harsh