शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी मोडले लग्न

By admin | Updated: April 21, 2016 02:32 IST

साक्षगंध झाल्यावर काही दिवसांनी लग्नाचे कपडे घेण्यासाठी वधूपिता मांडगावला गेले. यावेळी वराकडील मंडळींनी वधुपित्यास दोन लाख रुपये हुंडा मागितला.

वधुपित्याची पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रारसेवाग्राम : साक्षगंध झाल्यावर काही दिवसांनी लग्नाचे कपडे घेण्यासाठी वधूपिता मांडगावला गेले. यावेळी वराकडील मंडळींनी वधुपित्यास दोन लाख रुपये हुंडा मागितला. यामुळे हे लग्न तुटले. संतापलेल्या वधुपित्याने दहेगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. पण ठाणेदार याकडे लक्ष देत नसल्याने वधूपित्याने विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार देऊन न्यायाची मागणी केली. हमदापूर येथील रामचंद्र शेंडे यांच्या मुलीचे लग्न मांडगाव येथील संदीप रमेश चंदनखेडे यांच्याशी ठरले. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी हमदापूर येथे साक्षगंध झाले. काही दिवसांनी विवाहासाठी कपडे घेण्यासाठी म्हणून रामचंद्र शेंडे हे मांडगाव येथे चंदनखेडे यांच्याकडे केले. यावेळी वर पिता आणि इतरही मंडळींनी शेंडे यास दोन लाख रुपयांची मागणी केली. वधू पित्याने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे हे लग्न मोडले. त्यामुळे संतापलेल्या रामचंद्र शेंडे यांनी दहेगाव पोलीस स्टेशन तेथे सात जणांविरूद्ध तक्रार नोंदविली. पण कारवाई करतो या सबबीखाली ठाणेदार बनसोड यांनी सतत चालढकल केली. ठाण्यातून तिघांना जामीनही मिळाला. बाकी चार जण मोकाटच आहे. त्यामुळे ठाणेदार या कारवाईस बगल देत असल्याचा आरोप करीत रामचंद्र शेंडे यांनी पोलीस महानिरीक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार दाखल करीत त्या सात जणांवर कारवाईची मागणी केली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे.(वार्ताहर)