शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींना परिवहनच्या पासेस उपलब्ध करून द्या

By admin | Updated: July 27, 2014 00:15 IST

देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे) येथील शाळा सुरू होऊन महिना होत आला आहे़ तरीही शाळेत काही अंतरावरून ये-जा करीत असलेल्या दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सध्या बसच्या पास मिळाल्या नाहीत़

वर्धा : देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे) येथील शाळा सुरू होऊन महिना होत आला आहे़ तरीही शाळेत काही अंतरावरून ये-जा करीत असलेल्या दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सध्या बसच्या पास मिळाल्या नाहीत़ यामुळे त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे़ त्यांना लगेच बसेसच्या पास उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना निवेदनाद्वारे केली आहे़ शिवाय पास देण्यास विलंब करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली़ निवेदनानुसार कोळोणा (चोरे) येथील विद्यार्थिनी देवळी येथील जनता हायस्कूल, यशवंत हायस्कूल येथे आठवी व नववीमध्ये शिकत आहे़ शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला़ तरीही सदर विद्यार्थिनींना एस़ टी़ बसच्या पास मिळालेल्या नाही़ मुलींच्या शिक्षणासाठी राज्य शासनाने ही सुविधा सुरू केली आहे़ परंतु औदासिन्यतेमुळे विद्यार्थिनींना पासपासून वंचित राहावे लागत आहे़ आपल्या मुलींना पास सुविधा मिळावी या करिता पालकांनी पुलगाव आगार गाठून येथील आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. तसेच लवकरात लवकर पास उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता व्यवस्थापकांनी पास देण्यास नकार दिल्याचा आरोप निवेदनात केला आहे़ तसेच शाळा व्यवस्थापनानेही पास काढण्यासाठी प्रयत्न केले़ परंतु त्यांनाही यश आले नाही़ आजुबाजूच्या काही गावातील विद्यार्थ्यांना आगाराने पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ परंतु कोळोणा (चोरे) येथील विद्यार्थिनींना पास उपलब्ध करून न दिल्यामुळे हा दुजाभाव का असा प्रश्न या पालकांना पडला आहे़ शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत आगाराला सूचना देत पासची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्याची मागणी पालकांनी निवेदनाद्वारे केली आहे़ यावेळी शिष्टमंडळात संतोष नगराळे, बबन ओंकार, गौतम थुल, मारोती तेलंगे, भारत मडावी, सुरेश नगराळे, सुनील मानकर, उपासे, भुजाडे, आदींचा समावेश होता़(शहर प्रतिनिधी)