शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण झोपेत; केली लोकांची झोप खराब !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 17:26 IST

उन्हामुळे लोड वाढले : विद्युत पोल वाकल्याने वीजतारा लोंबकळताहेत

लोकमत न्यूज नेटवर्क 
चिकणी (जामणी):
जिल्ह्याचे तापमान पुन्हा एकदा तापायला लागले आहे. तापमान वाढले असताना महावितरणकडून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. रात्री बेरात्री केव्हा बत्ती गुल होईल याचा काही नेम नाही. वीज वाहून नेणाऱ्या बहुतांश वीजतारा लोंबकळत असल्याने थोडी जरी हवा सुटली तरी आपसात तारांचा स्पर्श होऊन फ्यूज जळतो. परिणामी वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांची रात्र खराब होत असल्याचे चित्र आहे. 

जून महिन्याचा आठवडा लोटला असूनही पारा तापलेलाच आहे. त्यामुळे आता सर्वच जण मान्सूनची प्रतीक्षा करत आहेत. महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली असली, तरी ग्रामीण व शहरी भागातील विजेचा लपंडाव मात्र सातत्याने सुरूच आहे. थोडाही वादळ, वारा, पाऊस आला की, वीज गायब होत आहे. असा कोणताही दिवस नाही की, त्यादिवशी वीज गेली नाही. त्यामुळे लोकांची झोपही खराब होत असून, शहरासह ग्रामीण भागातील नागरिक महावितरणच्या ढिसाळ कारभाराला वैतागले आहेत. नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत.


अधूनमधून वीज गायब
दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांना रात्रीतरी शांत झोप मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास झोपमोड होते. उष्मामुळे अंगाची लाहीलाही होते. झोपेमुळे हैराण झाल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा असते.


तक्रारी वाढल्या
अचानक विजेचा दाब वाढल्याने संबंधित फिडरवरील ग्राहकांना फटका बसतो. विद्युत उपकरणे खराब होत आहेत. वादळी वाऱ्यामुळे खांब वाकत असून कुठे तर रोहित्र सुद्धा जमीनदोस्त होत आहे. दुपारच्या वेळेत वीजपुरवठा अचानक खंडित होऊन ग्राहकांची झोपमोड होते. तक्रारीसुद्धा वाढल्या आहेत.


वीज जाण्याची कारणे काय?
• वीजवाहिनी तुटणे, रोहित्रातील बिघाड, वाहिन्या खराब होणे, वाऱ्यामुळे वीज तारांचे घर्षण, उपकेंद्रातील बॅटरी नादुरुस्त, रोहित्रातील तेल संपणे यासारख्या विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. सध्या तापमान वाढले आहे. मात्र, पावसाचा शिडकावा सुरू होण्याची लक्षणे दिसताच वीजपुरवठा खंडित केला जातो.
•  पिन इन्स्युलेटर, डिस्क इन्सुलेटर उन्हामुळे तापलेले असल्याने पावसाचे • पाणी पडताच फुटण्याचा धोका असल्याने खबरदारी म्हणून महावितरणकडून वीजपुरवठाच बंद केला जातो. वाऱ्यामुळे वीजवाहिनी तुटण्याचे प्रकार आता वाढू लागले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी वेळ जातो. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केला जातो.
• मान्सूनपूर्व कामाला महावितरणने गती। दिली आहे. ताराच्या बाजूचे झाडे तोडणे, धोकादायक वीज तार बदलवणे आदी काम करताना वीजपुरवठा खंडित करण्यात येत असतो.

सर्वच भागात हाल बेहाल
दिवसभरात अधूनमधून वीजपुरवठा गायब होत असल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होतो. वीजपुरवठा गायब होण्याची अनेक कारणे असली तरी तक्रारीही वाढल्या आहेत. याशिवाय सर्वच भागात हाल बेहाल आहेत.
 

टॅग्स :electricityवीजSummer Specialसमर स्पेशलHeat Strokeउष्माघात