शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचे लॉकडाऊन,अधिकाऱ्यांचे अप-डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

नागपूर, अमरावती व यवतमाळ हे वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तिन्ही जिल्हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना वर्धेत येण्याकरिता परवानगी दिली जात नाही; पण या तिन्ही जिल्ह्यातून मात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडूनच नियमांचे उल्लंघन : तपासणी नाक्यावर सर्वसामान्यांनाच अटकाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संचारबंदीमध्ये वर्ध्यातून कोरोनाबाधित जिल्ह्यात जाण्याकरिता सर्वसामान्यांना अटकाव करण्यात आला आहे. मात्र, या बंदीतही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोनाबाधित जिल्ह्यात संचार सुरुच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीच आपल्या ओळखपत्राच्या किंवा प्रवासपासच्या आधारे नियमोल्लंघन करीत असल्याने ‘जनतेसाठी लॉकडाऊन व अधिकाऱ्यांचे अप-डाऊन’ अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.कुणाचे लहान मुलं नागपूरात अडकले आहेत. कुणाच्या म्हाताऱ्या आईला यवतमाळातून वर्ध्याला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी आणायचे आहे तर कुणी आपल्या सासुरवाडीत अमरावतीला अडकून पडले आहे. नागपूर, अमरावती व यवतमाळ हे वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तिन्ही जिल्हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना वर्धेत येण्याकरिता परवानगी दिली जात नाही; पण या तिन्ही जिल्ह्यातून मात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषत: शनिवार व रविवार अशा दोन दिवस सुट्या असल्याने शुक्रवारीच जिल्ह्यातील काही विभाग विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी आपल्या यवतमाळ, अमरावती व नागपूर येथील स्वगृही गेले आहेत. एकीकडे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व वाहने तपासली जात असल्याचे सांगितले जात असतानाच ये-जा करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची यातून कसे सुटतात हा संशोधनाचा विषय ठरला आहे.... तर आज तपासणी नाक्यावर उलगडणार सत्यशासकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता यवतमाळ, अमरावती व नागपूर येथून आवागमन करत आहे. यात नागपुरातून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ही सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाकारली जात आहे. पण, सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी अमरावती, यवतमाळ व नागपूर या तिन्ही जिल्ह्यातून येणाऱ्या सीमांवर सकाळपासून तपासणी केली तर अपडाऊन करणाऱ्यांचे सत्य बाहेर आल्या शिवाय राहणार नाही. पण, प्रशासन हे करणार का? हा मुळ प्रश्न आहे.सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. कुणालाही ये-जा करण्याकरिता प्रवास पास दिलेली नाही. मुख्यालयी न राहता ते अपडाऊन करतात, या संदर्भात माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. यासंदर्भात संबंधितांकडून माहिती घेऊन कारवाई केली जाईल.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारीजिल्ह्याच्या सीमांवर तपासणी नाके लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी प्रत्येक वाहनांची तपासणी होत असून शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर कुणालाही ये-जा करण्यासाठी परवानगी नाही.- नीलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस