शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

मिनीमंत्रालयातील सभापतींचे दालन ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेश पारित करुन शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेतही प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विनाकारण येणाऱ्यांना अटकाव केला जात आहे. जिल्हा परिषदेतील सर्व सभापतींचे दालन बंद असून सर्व विभागातील कामकाज मात्र, सुरळीत सुरु आहे.

ठळक मुद्देकर्मचारी, अधिकारी कर्तव्यावर : काही पदाधिकाऱ्यांचा सर्कलमध्ये मुक्काम तर काहींच्या येरझारा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा सांभाळणाºया जिल्हा परिषदेत नेहमीच वर्दळ असायची. मात्र आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी व जमावबंदी लागू केल्याने मिनीमंत्रालयातील गजबजही कमी झाली आहे. येथील सभापतींचे दालन सध्या कुलूपबंद असल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांसह कार्यकर्त्यांची गर्दीही ओसरली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेश पारित करुन शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेतही प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विनाकारण येणाऱ्यांना अटकाव केला जात आहे. जिल्हा परिषदेतील सर्व सभापतींचे दालन बंद असून सर्व विभागातील कामकाज मात्र, सुरळीत सुरु आहे. विभागप्रमुखांनी तयार केलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीनुसार दररोज ५ टक्के कर्मचारी कर्तव्यावर हजर राहत आहे. तर जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी आपापल्या सर्कलमध्ये गरजू व गरिबांना सेवा देण्यासाठी तसेच सध्याच्या परिस्थिताचा आढावा घेण्यासाठी झटत आहे तर काही पदाधिकाऱ्यांचा घरीच मुक्काम असल्याचे चित्र आहे. तसेच इमारतीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून या परिसरातील नियमित स्वच्छता केली जात आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी कर्मचाºयांकडून आलेल्यांना सॅनिटायझर देऊन हात स्वच्छ करण्यास सांगितले जात आहे.इमारतीत निघतोय सिगारेटचा धूरशासकीय कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे निषिद्ध असले तरीही जिल्हा परिषदेत नेहमीच सिगारेटचा धूर निघताना दिसतो. सध्या संचारबंदीच्या काळातील जिल्हा परिषदेच्या इमारतीत तळमजल्यावर सिगारेटचा वास घुमतोय. त्यामुळे सर्व दुकाने व पानटपºया बंद असतानाही सिगारेटचे झुरके सोडणाऱ्या सिगारेट उपलब्ध होते कशी? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळातही चक्क जिल्हा परिषदेत सिगारेट ओढणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.संचारबंदीनंतरही ये-जा सुरुचसार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्याकरिता संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील काही सदस्य आपल्या सर्कलमधून जिल्हा परिषदेत येऊन गर्दी वाढवित असल्याचे दिसून येत आहे. काही सदस्य फक्त वाहनाने जिल्हा परिषदेत येतात. काही वेळ अळमटळम केल्यानंतर पुन्हा निघून जातात. तर काही सदस्य जिल्हा परिषदेत दिवसभर ठिय्या मारुन असतात. सदस्यांनी सध्याच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन जिल्हा परिषदेत गर्दी टाळण्यासाठी संचार थांबवावा. आपल्या सर्कलमध्ये राहूनच काही महत्वाचे कामे असतील तर ती भ्रमणध्वनीवरुन पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीzpजिल्हा परिषद