शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन मध्येही दारू विक्री सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. याचाच फायदा गल्ली बोळीत अवैध दारू विक्रेते घेत आहे. दारूबंदी नसलेल्या शहरातील परवानाधारक, बियरबार व दारुची दुकाने बंद करण्यात आली आहे. परंतू दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात मात्र अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. भाजीपाला मिळणे कठीण परंतु दारू मात्र सहज उपलब्ध अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देअवैध दारू विक्रेते जुमाने ना : ग्रामीण भागात चढ्या दराने दारूची विक्री वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचार बंदी लागू आहे. अशा स्थितीत केवळ जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. परंतु जिल्ह्यात दारूबंदी असताना संचार बंदीत ही दिवसभर दारू सर्वत्र मुबलक स्वरूपात उपलब्ध होत आहे. या अवैध दारू दुकानात ४ पेक्षा अधिक लोकांची गदीर्ही होत असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी वेगळे पथक तयार करून कलम १४४ अंतर्गत कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. याचाच फायदा गल्ली बोळीत अवैध दारू विक्रेते घेत आहे. दारूबंदी नसलेल्या शहरातील परवानाधारक, बियरबार व दारुची दुकाने बंद करण्यात आली आहे. परंतू दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात मात्र अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. भाजीपाला मिळणे कठीण परंतु दारू मात्र सहज उपलब्ध अशी स्थिती आहे.संचारबंदीचा लाभ घेत चढ्या दराने देशी, विदेशी दारू, बिअर, व गावठी दारू विक्री सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. त्यामुळे अवैद्य दारुच्या दुकानातील सततच्या वर्दळीत एकमेकांच्या संपर्काने कोरोणाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ नये. अवैध दारू विक्रीतून कोरोना विषाणू प्रसाराचा संभाव्य धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी दारू विक्रेत्या साठी वेगळे पथक तयार करून अवैध दारू विक्री व कलम १४४ चे उल्लंघन याबाबत संबंधीतांनवर कडक कारवाई करावी अशी मागणी हिंगणघाट येथील नागरिकांनी केली आहे.अवैध दारुचे गुत्थे राजरोसपणे सुरुचतळेगांव (शा.पं.) :- देशासह राज्यात कोरोणाने सर्वत्र थैमान घातल्याने साथरोग प्रतिबंधक कायद्याखाली जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हॉटेल्स, चहाटपरी, पानठेले जीवनावश्यक वस्तुचे दुकाने वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कोणतीही व्यक्ती, संघटना, संस्था यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तळेगावसह आजुबाजुच्या गाव परिसरातील अवैध दारुचे गुत्थे राजरोसपणे सुरु आहे. दारु काढण्याकरीता लागणारे साहीत्य हे ज्या दुकानात मिळते ते दुकान बरोबर या साहित्याचा पुरवठा करीत आहे. पोलिस यंत्रणेवर संचार बंदीचा ताण असल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. गावागावात दारूची विक्री वाढली असून आता संचारबंदी काळात दारूचे उत्पादन व विक्रीचे दर वाढले आहे. याकडे पोलिस यंत्रणेने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावात दररोज दारूच्या दुकानाजवळ रांग दारू खरेदीसाठी लागलेली दिसत आहे. या गर्दीमुळे कोरोणा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या