शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अडी-अडचणीतून शाळाशाळांत ‘लाईव्ह मोदी’

By admin | Updated: September 6, 2014 02:14 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याच्या सूचना शिक्षकांना मिळाल्या. या सूचना मिळताच शिक्षकांनी टीव्ही, केबल, इंटरनेट आदी साहित्य ...

वर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याच्या सूचना शिक्षकांना मिळाल्या. या सूचना मिळताच शिक्षकांनी टीव्ही, केबल, इंटरनेट आदी साहित्य गोळा करण्याची धावपळ सुरू केली. साहित्य गोळा केल्यानंतर अखेर भाषणाचा शिक्षक दिन उजळला. आपण गोळा केलेल्या साहित्यात सारे भागणार ना याची शाश्वती शिक्षकांकडून करण्यात आली. चाचपणी करतानाच दुपारी ३.१५ वाजता भाषणाला प्रारंभ झाला. सायंकाळी ४.४५ वाजता भाषणाचा शेवट झाला. हा दीड तासांचा कालावधी शिक्षकांकरिता चांगलीच कसरतीचा ठरला. या कार्यक्रमाचा अहवाल तयार करावयाचा असल्याने शिक्षकांनी अनेक अडीअडचणीतून मार्ग काढत विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे भाषण ऐकविल्याचे चित्र शुक्रवारी जिल्ह्यात बघायला मिळाले.बहुतेक शाळांमध्ये स्वयंशासन हा उपक्रम राबविला जातो. या दिवशी चपराशी, शिक्षकांपासून तर मुख्याध्यापकांची भूमिका ही विद्यार्थ्यांना पार पाडावयाची असते. परंतु यंदा नाविण्यपूर्ण बाब ठरली ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह भाषण. सर्वप्रथम हे लाईव्ह भाषण प्रत्येक शाळेत दाखविल्या जाणे बंधनकारक असल्याचे पत्र शिक्षण विभागाद्वारे शिक्षणाधिकारी कार्यालयात धडकले होते. त्यानुसार सर्व शाळांमध्ये आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करणे सुरू झाले होते. शहरातील शाळांसाठी ही बाब तितकी कठिण नसली तरी ग्रामीण भागात ही तजवीज करताना शिक्षकांची चांगलीच धांदल झाली. यासाठी आवश्यक असलेले टिव्ही, रेडिओ, इंटरनेट कनेक्शन अशा साहित्याची तजवीज करण्याची जबाबदारी शाळांवरच टाकल्यामुळे शिक्षकांमध्ये सर्वत्र नाराजी पसरली होती. गुरुवारपर्यंत शिक्षण विभागाने हे भाषण दाखविणे बंधनकारक नसल्याचा दुसरा आदेश पाठविल्याने शिक्षकांना जरी हायसे वाटले असले तरी यासंदर्भातील अहवाल प्रत्येक शाळेला पाठवायचा असल्याने शाळांनी मोदी लाईव्ह दाखविण्याची खटपट पूर्ण केली. यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. गोंगाटामुळे नेमके भाषण काय झाले हे बहुतेक विद्यार्थ्यांना कळलेच नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)